पाऊस ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा या हाकेची वाट न बघता तू बरसला लोकांना पाहिजे तसा नदी नाले धरणे भरली शेतकरी बघून आनंदी झाले हिरवी हिरवी पिके बघून शेतकरी राजे समाधान पावले गाईगुरे जनावर्यांना मिळतो हिरवा हिरवा छान चारा दही दुध तूपाने मिळतात चार पैसे शेतकरी नाही राहिला आता बिचारा शेतमालाला मिळतो चांगला भाव शेतकरी आनंदी झाले हातात आलेले पिक जाऊ नये वाया याच्या भीतीने मन त्याचे ग्रासले वीज मिळते मोफत शेतकर्यांना बहिणींना मिळाला लाडका भाऊ दिवाळी जवळ आल्याने बहिणी खातील आता चांगला खाऊ पावसाचे मानू या आभार सगळीकडे दिला त्याने आनंद नदी तलाव धरणात पाणी बघून मनाला होतो परमानंद सर्व सुख बघून उतू नये मातू नये माणसा माणसातील माणूसकी जपावी माणसा माणसात भेदभाव नसावा सर्वजण गुण्यागोविंदाने नांदावी अशीच कृपा गणराया राहू दे करु तुझी मनोभावे सेवा तुझ्याशिवाय कोण देईल सुखाचा आनंदाचा समाधानाचा मेवा दगा देवरे सर