आजचे विद्यार्थी
आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइतकेच वही आहे तर पेन आहै पेन आहे तर लिहून घ्यायची इच्छा नाही वर्गात तास असेल तर शिक्षकांना फसवून इतर कामं करणे व प्रश्न विचारले तर उत्तर माहीत नसते मग एवढं धाडस कुठून येते मनाची लाज त्यांना वाटत नाही काही नुसतेच टाईमपास करतात आपल्या पालकांनी का पाठवले असेल किंवा स्वत:चे स्वप्न काय आहेत हेच माहीत नसते मग मोबाईल मध्ये काहीतरी शोधणे त्याच्यात वेळ घालवणे हे बघून फार वाईट वाटते देवावर विश्वास नाही म्हणजे स्वत:वरच विश्वास नाही मोठ्यांचा आदर माहीत नाही चांगल्य गोष्टी सांगितल्या की त्यांना त्या आवडत नाही तीस पस्तिस वर्ष होते तरी कायम स्वरुपी नोकरी नाही मग लग्न नाही कोणतेही ध्येय नाही .म्हणून विचारतो काय झालं आजकालच्या मुलांना . का ऐकत नसतील चांगल्या गोष्टी. कधी अक्कल येईल यांना .स्वत:चे विश्व वेगळे करून घेतले व ते विश्व फार चांगले नाही .कष्ट करायची सवय नाही जे पाहिजे ते मिळत. नाही मिळाले तर धांगडधिंगाणा घालायचा व ते मिळवायचे .काहीमुले याला अपवाद आहैत पण फारच कमी10% असतील असे मुले . पण 90% मुले फार बेशिस्त झालैत त्यामुळे शिक्षक पालक चिंतेत आहेत .आभासी साधने त्यांना चांगल्या गोष्टी करु देत नाही किंवा हे विद्यार्थी त्यातून चांगलै घेत नाही खोटे वागून चिटिंग करुन पास व्हायचे एवढी वाईट प्रवृती झाली आहे त्यामुळे त्यांचे भवितव्य अंधातरी झाले आहे.महागाईने कळस गाठला व यांच्या अपेक्षा फार असतात .साधे हाॅटेल नको साधे केसकर्तनालय नको साधे थियटर नको माॅलमध्ये पिंचर बघायचा असतो साधे कपडे नको सायकल वापरायला लाज वाटते टूव्हिलर पाहिजे साध्या चपला नको घरचे खाणे आवडत नाही बर्गर पिज्जा वडा पाव मॅगी तसेच अनेक प्रकारचे बाहेरचे पदार्थ जे शरीराला हानीकारक असतात तेच आवडतात. एवढा शौक घरचे आहेत तोपर्यंत पण पुढे काय आपल्याला शौक एवढा असेल तर तसा अभ्यांस करून स्वत:ला सिध्द करायला पाहिजे ना .रात्र पहाटं करून झटले पाहिजे अभ्यासाच्या वेळात अभ्यास व खेळायच्या वेळेत खेळले पाहिजे तरच तुमचे ध्येय गाठू शकणार मग तुमचे शौक पूर्ण होतील व तेही स्वत:च्या जीवावर म्हणून आजचा विद्यार्थी झोपेचे नाटक करतो आहे व त्याला जबाबदार पालकही आहेत मुलं काय करतात हे बघायला त्यांना वेळ नाही त्यामुळे ही मुले भरकटतं चालली . त्यातून त्यांना सावध करायची फार गरज आहे .बघा जमतं का
प्रा.दगाजी देवरे
पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...
काही वर्षांपूर्वी ऐकले होते की काही देशात, लोकं करीअर, भारतासारखे, विशीच्या आत किंवा पंचवीशीच्या आत सुरू करत नाहीत. मला वाटते की आपल्या कडेच इतक्या लहान वयात इतकी मोठी आणि आयुष्य भराची जबाबदारी घेतात. शिक्षण, पदवी, नोकरी / धंदा, लग्न, मुले..... असे फास्ट ट्रॅक आयुष्य आखलेले असते. आणि थोरामोठ्यांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखाली व्यवस्थित आखीव रेखीव आयुष्य बनवले जाते. कधी कधी मला असा प्रश्न पडतो की १४/१६/२०/२२ या वयात खरंच मुले इतका मोठा निर्णय घेऊ शकतात का? कदाचित आता त्यांना इंटरनेट मुळे काॅलेज शिक्षणा व्यतिरीक्त अन्य संधी पण दिसत असतील. किंवा शिक्षणाची ही पद्धत आवडत नसेल.
ReplyDelete