माणूस व समुद्र माणसाची व समुद्राची तुलना केली तर बरेच साम्य आढळते .समुद्राला किनारा असतो तसा माणसाला जन्म असतो .समुद्राच्या किनार्यावर उभे राहिले तर दुसरा किनारा त्याचा दिसत नाही त्याचप्रमाणे जन्माची तारीख माहीत असते पण मरण कधी हे त्या किनार्यासारखे दिसत नाही .समुद्रात लाटा ह्या चालूच असतात .कधीच समुद्र शांत नसतो .कधी लाटा छोट्या असतात तर कधी त्या एवढ्या मोठ्या असतात की किनारा सोडून पाणी वाहते त्याचप्रमाणे माणसाचे जीवन कधीच शांत नसते .सुख व दु:ख यांच्या लाटा सतत त्याच्या जीवनात येत असतात कधी कधी सुख व दु:ख एवढ्या मोठ्या प्रमाणात येते की माणूस आपले अस्तित्व विसरतो की काय असे त्याला वाटू लागते .समुद्राचे पाणी भरपूर असते पण पिण्याला ते उपयोगाचे नसते तसेच माणसाच्या जीवनात सुख भरपूर असते पण त्या सुखाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याच्यात नसतो म्हणून सुख राहूनही ते त्याला दृष्टिकोनामुळे उपभोगता येत नाही .समुद्रात अनेक प्रकारचे जलचर असतात व ते मजा मारतात त्याचप्रमाणे माणसाच्या जीवावर अनेक प्रकारचे प्राणी जगत असतात व माणूस हा त्यांचा आधार असतो.माणसाचे मन समुद्रासारखे असते पण ते त्...