Skip to main content

समुद्र व माणूस

माणूस व समुद्र
माणसाची व समुद्राची तुलना केली तर बरेच साम्य आढळते .समुद्राला किनारा असतो तसा माणसाला जन्म असतो .समुद्राच्या किनार्‍यावर उभे राहिले तर दुसरा किनारा त्याचा दिसत नाही त्याचप्रमाणे जन्माची तारीख माहीत असते पण मरण कधी हे त्या किनार्‍यासारखे  दिसत नाही .समुद्रात लाटा ह्या चालूच असतात .कधीच समुद्र शांत नसतो .कधी लाटा छोट्या असतात तर कधी त्या एवढ्या मोठ्या असतात की किनारा सोडून पाणी वाहते त्याचप्रमाणे माणसाचे जीवन कधीच शांत नसते .सुख व दु:ख यांच्या लाटा सतत त्याच्या जीवनात येत असतात कधी कधी सुख व दु:ख एवढ्या मोठ्या प्रमाणात येते की माणूस आपले अस्तित्व विसरतो की काय असे त्याला वाटू लागते .समुद्राचे पाणी भरपूर असते पण पिण्याला ते उपयोगाचे  नसते तसेच माणसाच्या जीवनात  सुख भरपूर असते पण त्या सुखाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याच्यात नसतो म्हणून सुख राहूनही ते त्याला दृष्टिकोनामुळे उपभोगता येत नाही .समुद्रात अनेक प्रकारचे जलचर असतात व ते मजा मारतात त्याचप्रमाणे माणसाच्या जीवावर अनेक प्रकारचे प्राणी जगत असतात व माणूस हा त्यांचा आधार असतो.माणसाचे मन समुद्रासारखे असते पण ते त्याला माहीत नसते म्हणून तो मन हे संकुचित करतो व विविध यातना भोगतो पण जर त्याने आपले मन समुद्रासारखे विशाल ठेवले तर मग समुद्रासारखे सगळ्यांचे अपराध पोटात घालतो व सतत आनंदात उसळ्या मारायला लागतो .समुद्राला चंद्राच्या आकर्षनाने भरती व ओहोटी येते त्याचप्रमाणे माणसाला कुणामुळे तरी सुख व दु:खाचा सामना करावा लागतो काही माणसं त्याच्या जीवनात आडवे येतात किंवा दिशा दाखवतात व त्यांच्यामुळे तो सुख व दु:ख भोगतो किंवा माणसाचे कर्म हे चंद्रासारखे असते त्या कर्माच्या गतीमुळे कधी माणूस सुखभोगतो तर कधी दु:ख.समुद्र ओलांडून जायचा असेल तर नावेचा वापर करावा लागतो तसेच संसाराचा भवसागर तरुन जायचा असेल तर देवाच्या नामारुपी नावेचा वापर करुन तरुन जाता येते म्हणून माणसाला समुद्रासारखे विशाल मन करता यायला हवे .
दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...