वाढदिवस बर्याच जणांचा असतो वाढदिवस एक आणि दोन जूनला गुरुजींचीच कृपा त्यांच्या मर्जीनेच घातले शाळेला काहींचे वर्ष पुढे केले तर काहींचा मागे झाला रेटा काही नोकरदारांचा झाला फायदा तर काहींचा झाला तोटा एकाच घरात सर्वांचा वाढदिवस साजरा होतो एकाच दिवशी अनेक पार्टींचे पैसे तेवढे वाचतात आणि शुभेच्छा मिळतात फक्त एकाच दिवशी शाळेत मुलाला टाकले हिच झाली कृपा गुरुजींची मुले झाली सारी साक्षर धुळ लावावी कपाळाला त्यांच्या पायांची शिक्षणाला महत्व दिले गुरुजींनी म्हणून लोकं पोहचली मोठ्या पदावर काही करतात गुरुजींची टिंगल मन नसते तेव्हा भानावर गुरुजी होते आपल्या जीवनात म्हणून सारी सुखे आपण चाखतो त्यांना जीवनातून वजा केल्यावर काहीच नसते असे मी म्हणतो जून महिना व वाढदिवस यासाठीच येते आठवण गुरुजींची त्यांनी दिलेले ज्ञान व संस्कार यातून आठवण ठेवावी त्यांची दगा देवरे