Skip to main content

वाढदिवस

वाढदिवस
बर्‍याच जणांचा असतो वाढदिवस
एक आणि दोन जूनला
गुरुजींचीच कृपा
त्यांच्या मर्जीनेच घातले शाळेला

काहींचे वर्ष पुढे केले
तर काहींचा मागे झाला रेटा
काही नोकरदारांचा झाला फायदा
तर काहींचा झाला तोटा

एकाच घरात सर्वांचा वाढदिवस
साजरा होतो एकाच दिवशी
अनेक पार्टींचे पैसे तेवढे वाचतात
आणि शुभेच्छा मिळतात फक्त एकाच दिवशी

शाळेत मुलाला टाकले
हिच झाली कृपा गुरुजींची 
मुले झाली सारी साक्षर
धुळ लावावी कपाळाला त्यांच्या पायांची

शिक्षणाला महत्व दिले गुरुजींनी
म्हणून लोकं पोहचली मोठ्या पदावर
काही करतात गुरुजींची टिंगल
मन नसते तेव्हा भानावर

गुरुजी होते आपल्या जीवनात
म्हणून सारी सुखे आपण चाखतो
त्यांना जीवनातून वजा केल्यावर
काहीच नसते असे मी म्हणतो

जून महिना व वाढदिवस
यासाठीच येते आठवण गुरुजींची
त्यांनी दिलेले ज्ञान व संस्कार
यातून आठवण ठेवावी त्यांची

दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...