आनंद आहे कुठे प्रत्येक व्यक्तीला आनंद पाहिजे असतो पण खरा आनंद कसा मिळवावा हे मात्र माहीत नसते .भौतिक गोष्टी जमविण्यात माणसाला आनंद वाटतो पण तो आनंद टिकत नाही कारण भौतिक गोष्टी कधीतरी बिघडतात व त्यावेळी त्याला दु:ख होते म्हणून भौतिक गोष्टी कायमस्वरुपी आपल्याला आनंद देऊ शकत नाही तसेच काही व्यक्तींमूळे आपल्याला आनंद होतो पण तो ही टिकत नाही कारण ती व्यक्ती आपल्यापासून कधीपण दूर जाऊ शकते काहीतरी बिनसल्यामुळे किंवा या जगातून ती व्यक्ती गेल्यामुळे. मग व्यक्तीमुळे ,भौतिक गोष्टीमुळे आनंद कायम राहत नाहीत बर्याच वेळा ज्या गोष्टी आपल्या खूप जवळ असतात मग त्या व्यक्ती असो नाहीतर वस्तू त्या जास्तीत जास्त आपल्याला त्रास देतात किंवा त्यांच्याकडून दु:ख मिळत राहते कारण त्या आपल्याजवळ असल्याने आपण जास्त अपेक्षा धरतो व त्या अपेक्षांची पूर्ति झाली नाही की मग आपल्याला दु:ख होते .आता खरा आनंद कोणापासून मिळेल याचा विचार करु.खरा आनंद आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो .आपण त्या गोष्टीचा कसा विचार करतो कोणत्या बाजूने विचार करतो यावर अवलंबून असतो .प्रत्येक गोष्टीत चांगले व वाईट असते तर आपण जर चांगले बघण्याचा ...