Skip to main content

आनंद

आनंद आहे कुठे

प्रत्येक व्यक्तीला आनंद पाहिजे असतो पण खरा आनंद कसा मिळवावा हे मात्र माहीत नसते .भौतिक गोष्टी जमविण्यात माणसाला आनंद वाटतो पण तो आनंद टिकत नाही कारण भौतिक गोष्टी कधीतरी बिघडतात व त्यावेळी त्याला दु:ख होते म्हणून भौतिक गोष्टी कायमस्वरुपी आपल्याला आनंद देऊ शकत नाही तसेच काही व्यक्तींमूळे आपल्याला आनंद होतो पण तो ही टिकत नाही कारण ती व्यक्ती आपल्यापासून कधीपण दूर जाऊ शकते काहीतरी बिनसल्यामुळे किंवा या जगातून ती व्यक्ती गेल्यामुळे. मग व्यक्तीमुळे ,भौतिक गोष्टीमुळे आनंद कायम राहत नाहीत बर्‍याच वेळा ज्या गोष्टी आपल्या खूप जवळ असतात मग त्या व्यक्ती असो नाहीतर वस्तू त्या जास्तीत जास्त आपल्याला त्रास देतात किंवा त्यांच्याकडून दु:ख मिळत राहते कारण  त्या आपल्याजवळ असल्याने आपण जास्त अपेक्षा धरतो व त्या अपेक्षांची पूर्ति झाली नाही की मग आपल्याला दु:ख होते .आता खरा आनंद कोणापासून मिळेल याचा विचार करु.खरा आनंद आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो .आपण त्या गोष्टीचा कसा विचार करतो कोणत्या बाजूने विचार करतो यावर अवलंबून असतो .प्रत्येक गोष्टीत चांगले व वाईट असते तर आपण जर चांगले बघण्याचा प्रयत्न केला तर आपण आनंदी होतो .एकच गोष्ट एकाला दु:खी करते तर दूसर्‍याला आनंदी करते कारण ते अवलंबून असते त्यांच्या विचारांवर.झाडाला जेवढे जास्त फळे असतात तेवढे जास्त झाड झुकते तसेच माणसाजवळ जेवढे जास्त ज्ञान तेवढा तो झुकला पाहिजे म्हणजे नम्र असला पाहिजे पण तसे दिसत नाही जसे जसे ज्ञान येऊ लागते तसा तसा त्याचा ताठरपणा वाढू लागतो व हाच ताठरपणा आनंद हिरावून नेतो .दुसरे म्हणजे भूतकाळात झालेली वाईट घटना याचे आपण सतत चिंतन करत राहतो त्यामुळे वर्तमान हा आपण चांगला असूनही खराब करत असतो .आज आपल्याजवळ भरपूर पैसे आहेत पण भूतकाळात आपल्याला खायला पण पोटभर मिळत नव्हते याचे सतत चिंतन केल्यामुळे आज असलेला पैसा आपल्याला आनंद देत नाही .भूतकाळाची जाणीव जरूर असावी पण वर्तमानात आपल्याजवळ असूनही उपभोग घेता आला पाहिजे तसेच एखाद्याबद्दल आपल्या मनात भरपूर राग आहे तर त्या व्यक्तीचे सतत चिंतन केल्यामुळे आपले मन अशांत होते अशावेळी त्या व्यक्तीमध्ये असणार्‍या देवाला नमस्कार करावा व त्या व्यक्तीत असणार्‍या negative गोष्टींना blessing देऊन त्याचेही कल्याण व्हावे असा विचार करावा म्हणजे त्याचे चिंतन होणार नाही व झालेच तर आपल्याला त्रास होणार नाही म्हणून माफ करणे ही साधी सोपी पद्धत आहे आनंदी राहण्याची.बदल्याची भावना आपल्याला दु:ख देते तर माफ करण्याची भावना आनंद देते तसेच आपल्याजवळ जे नाही त्याचा विचार करुन आपण दु:खी होतो पण आपल्याजवळ जे आहे त्याचा विचार केला तर आनंद होईल कारण आपल्याजवळ जे आहे ते बर्‍याच जणांजवळ नाही असा विचार करावा त्यामुळे व्यक्ती असो किंवा वस्तू ज्या जवळ आहेत आपल्या त्यांचा जास्तीत जास्त respect करावा कारण त्या दूर गेल्या की मग आपल्याला त्यांची किंमत कळते म्हणून जवळ असतांनाच त्यांची किंमत करायला हवी .आपली तुलना दुसर्‍याबरोबर केल्याने आपण दु:खी होतो आपण आपल्या ठिकाणी ग्रेट आहोत ही भावना आपल्याला आनंद देऊन जाते म्हणून आनंद हा दुसरीकडे नाही तर तो आपल्या विचारांवर, आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे म्हणून म्हणतात -आहे तुजपासी पण जागा चुकलासी.बघा पटतं का
देवरे सर 
रुपारेल काॅलेज मुंबई

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...