फक्त एक दिवस qqqआपल्याला एका दिवसाचे महत्व दैनंदिन जीवनात काहीही नसते पण असे काही घडते की त्यामुळे आपल्याला त्यासाठी फक्त एक दिवस हवा असतो.आपल्या माणसांना आपण गृहीत धरत असतो .आपल्याशिवाय त्याला कोण आहे व तो आपल्याकडेच येणार कुठेही जाणार नाही अशा भावनेने आपण त्या व्यक्तीशी वागत असतो .त्या व्यक्तीने आपल्याकरिता कितीही चांगले केले असेल तरी त्याची आठवण आपण ठेवत नाही व qqत्याबदल्यात त्या व्यक्तीवर प्रेम, तिची काळजीq ,तिला काय हवे व काय नको याचा विचारही आपल्या मनात नसतो .तिने जे केलेले असते त्याची कदर आपल्याला नसते .आपण वेगळ्याच धुंदीत वागत असतो .त्या व्यक्तीने आपल्याजवळ एखाद्या गोष्टीची मागणी केली तर आपण त्या मागणीकडे कानाडोळा करतो व आताच कशाला हवे ,करु नंतर कधीतरी अशा विचारात असतो असे त्या व्यक्तीबरोबर अनेक वर्ष निघून जातात पण तिची किंमत आपल्या ध्यानीमनी नसते मग एक दिवस अचानक ती व्यक्ती आजाराने ,अपघाताने आपल्यातून निघून जाते .आपण कधीही कल्पना केलेली नसते की अचानक ती निघून जाईल म्हणून मग आपले डोळे खाडकन उघडतात व त्या व्यक्तीचे महत्व आपल्याला जाणवायला लागते .तिची पोकळी आपल्य...