फक्त एक दिवस
qqqआपल्याला एका दिवसाचे महत्व दैनंदिन जीवनात काहीही नसते पण असे काही घडते की त्यामुळे आपल्याला त्यासाठी फक्त एक दिवस हवा असतो.आपल्या माणसांना आपण गृहीत धरत असतो .आपल्याशिवाय त्याला कोण आहे व तो आपल्याकडेच येणार कुठेही जाणार नाही अशा भावनेने आपण त्या व्यक्तीशी
वागत असतो .त्या व्यक्तीने आपल्याकरिता कितीही चांगले केले असेल तरी त्याची आठवण आपण ठेवत नाही व qqत्याबदल्यात त्या व्यक्तीवर प्रेम, तिची काळजीq ,तिला काय हवे व काय नको याचा विचारही आपल्या मनात नसतो .तिने जे केलेले असते त्याची कदर आपल्याला नसते .आपण वेगळ्याच धुंदीत वागत असतो .त्या व्यक्तीने आपल्याजवळ एखाद्या गोष्टीची मागणी केली तर आपण त्या मागणीकडे कानाडोळा करतो व आताच कशाला हवे ,करु नंतर कधीतरी अशा विचारात असतो असे त्या व्यक्तीबरोबर अनेक वर्ष निघून जातात पण तिची किंमत आपल्या ध्यानीमनी नसते मग एक दिवस अचानक ती व्यक्ती आजाराने ,अपघाताने आपल्यातून निघून जाते .आपण कधीही कल्पना केलेली नसते की अचानक ती निघून जाईल म्हणून मग आपले डोळे खाडकन उघडतात व त्या व्यक्तीचे महत्व आपल्याला जाणवायला लागते .तिची पोकळी आपल्या जीवनात जाणवायला लागते .तिने केलेले आपल्यासाठी चांगले काम आपल्याला आठवायला लागते व तिच्याविषयी आपल्या मनात असलेली आढी आपल्याला लक्षात यायला लागते व तिला आपण काहीच देऊ शकलो नाही तसेच तिची साधी इच्छा आपण पूर्ण करु शकलो नाही याची सल मनात घर करुन राहते त्यामुळे देवाकडे आपण एकच मागणे मागतो फक्त एक दिवस तिला माझ्याकडे पाठव .त्या एका दिवसात तिच्या सर्व मागण्या मी पूर्ण करीन .तिला भरभरुन प्रेम देईन .माझे सर्वस्व अर्पण करीन फक्त एक दिवस.पण तो एक दिवस कधीही येऊ शकत नाही म्हणून ती व्यक्ती आपल्याजवळ असतांनाच जर आपण जागृत असलो तर आपण बेफिकीरपणे कधीही वागणार नाही म्हणून जागृता फार महत्वाची असते .जेव्हा जीवंतपणीच तिचे महत्व तुम्हांला पटले तर ती व्यक्ती गेल्यावर सुद्धा तुम्हांला आतून आनंद व समाधान मिळेल कारण तिच्या सर्व इच्छा जीवंतपणीच तुम्ही पूर्ण केलेल्या असतात म्हणून पुढे तो एक दिवस देवाकडे मागण्याऐवजी आज तुमच्याकडे भरपूर दिवस आहेत त्याचा विचार करुन त्या व्यक्तीची किंमत करायला शिकले पाहिजे म्हणजे पुढे पश्चातापाची वेळ येणार नाही .बघा पटतं का?
दगा देवरे सर
Comments
Post a Comment