राग का येतो प्रत्येक माणसाला राग येतोच मग कुणाचा राग कमी तर कुणाचा राग जास्त असतो.काहींना रागाच्या भरात आपण काय करतो याचे भान नसते त्यामुळे रागाच्या भरात समोरच्याचे आपण किती नुकसान करतो व स्वत:चे किती नुकसान होते याचे भान नसते .मन सैरभैर झालेले असते त्यामुळे बुद्धी काही तरी विचित्र निर्णय घेते त्यामुळे माणसाचे प्रचंड नुकसान होते व घरात व मनात शांती नांदत नाही .बर्याच वेळा आपल्याला जो राग येतो त्याचे खापर आपण दुसर्यांवर फोडतो .अमुकने तमुक केले म्हणून मला राग आला म्हणजेच आपला रिमोट आपण दुसर्याच्या हातात देऊन मोकळे होतो .दुसरा हवा तेव्हा बटन दाबेल व आपण रागात थैमान घालत बसू मग आपल्यात व निर्जीव टि व्हीत काय फरक आहे ? आता हा राग का उत्पन्न होतो प्रत्येक माणसाला वाटते आपल्याला हवे ते मिळाले पाहिजे व मी जे सांगेल ते समोरच्याने ऐकले पाहिजे .मला अपशब्द कुणी बोलता कामा नये.आपल्या अपेक्षांची पूर्ती झाली नाही की मग राग येतो .आपल्या मनासारखे घडले नाही किंवा आपल्या मनासारखं दुसरा वागत नाही तर राग हा येतो .माझे मत चुकीचे जरी असले तरी माझेच...