झंझट नसावे अंगाशी येणारे कोणते झंझट मनशांती जाते बिघडून अस्ताव्यस्त होऊन जाते सुरळीत चाललेले जीवन घरातील भांडणे जाताता विकोपाला अगदी क्षुल्लक कारणाने राग त्यावेळी नाही आवरला मन भरुन जाते पश्चातापाने पैसा संपत्ती याच्या लोभापायी बरेचजण चक्कर काटतात न्यायालयाचे जवळ असलेला पैसा जातो आपली माणसेही दुरावतात कायमचे आॅफिसमध्ये जेथे आहे नोकरी व्यवसाय तेथेही नियमाने शांतीने करावे काम उगीचच नियमांचा भंग करुन भ्रष्ट मार्गाने कमवू नये दाम वरिष्ठांचा मान राखून शिस्त ही अंगी बाळगावी कुणाचा अपमान न करतात अवास्तव अपेक्षा न करावी चालतांना बोलतांना आपण मोजून मापून शब्द वापरावे चौकशीचा फेरा मागे न लागता शांत जीवन जगावे दिवसभर नितीने काम केले झोप घेते त्याला कवेत अनितीने काम करणार्यांना कळ येते त्याच्या छातीत कोणतेही काम करतांना नियतीचा असतो आपल्यावर कॅमेरा याची ज्याला असते जाणीव त्याच्यामागे कधीच लागत नाही ससेमिरा कुणाचा हेवा न करता आपण आपल्या ठिकाणी असतो श्रेष्ठ आपली किंमत वाढविण्यासाठी कुणाला मानू नये कनिष्ठ जो नेहमी जागृत असतो त्याच्या वाटेला येत नाही झंझट नको त्या गोष्टीत वेळ न...
वळण आयुष्याला कधी वळण मिळेल हे कुणालाच येत नाही सांगता काही वळण असते चांगले तर काही वळण बरबाद करते जाता जाता माणूस चालता चालता असतो अनभिज्ञ वळणाची नसते त्याला कल्पना सावध असलेल्या माणसाला भिती नसते वळतांना काळ हा असतो टपलेला झडप घालतो शिकारीवर माणूस असतो त्यावेळी हतबल काहीच उपाय नसतो त्यावर पैसा संपत्ती पद हे ठरते काळापुढे अगदी शून्य माणसाच्या डोक्यातील हवा नियतीपुढे असते नगण्य एका क्षणाला माणूस मारतो भरारी तर दुसर्याच क्षणाला पडतो तो धरतीवर याला काय कारण असावे हे प्रत्येकाचे आहे वेगवेगळे मतेमतांतर काही वळण असते माणसाच्या आयूष्याचा शेवट वळणाआधी माणसाने करावा चांगले काम करण्याचा घाट एका चुकीची शिक्षा कधीतरी चुकवावी लागते कोणत्याही नशेत न राहता जागृतता महत्वाची असते आज आहे ते उद्या असेलच हे सांगता येत नाही देवाचे नामस्मरण करावे त्यामुळे माणूस खचून जात नाही जीवन आहे दोन दिवसाचे याचे स्मरण नेहमी ठेवावे कुणीही आपल्याबरोबर नेहमी असणार ह्या भ्रमापासून दूर राहावे आपण आहोत प्रवासी माहीत नाही कधी संपेल प्रवास प्रवासाचा आनंद घ्यावा मग कुणाचाही असेल सहवास दगा देवरे