सत्य पण असते असत्य
आपण जर बघितले तर पृथ्वीचे अस्तित्व विश्वाच्या तुलनेत अगदी नगण्य आहे कारण पृथ्वीच्या कैकपटीने मोठे ग्रह विश्वात आहेत .पृथ्वी अवकाशात अधांतरी आहे व ती फिरते आहे .ती अधांतरी आहे व फिरते आहे हे आपल्याला दैनंदिन जीवनात काम करत असतांना दिसत नाही व तसा विचारही मनात येत नाही .अशा अधांतरी पृथ्वीवर अनेक लढाया झाल्या .अनेक महापुरुष जन्माला आलेत .जी पृथ्वी विश्वाच्या तुलनेत अगदी नगण्य आहे त्या पृथ्वीवर लोक जमीनीच्या बांधावरुन भांडतांना दिसतात.अशा पृथ्वीवर चार पाच बंगले मोठा अधिकारी म्हणून अहंकार जो घुसतो तो उतरणे शक्य नाही.जो सूर्य दिसतो तो उगतांना व मावळतांना दिसतो पण तसे काही नसते कारण तो स्थिर आहे व हे दिसणे पण आभास आहे सत्य नाही.पुढील बर्याच वर्षाची माणूस चिंता करतो पण पुढील क्षणाला काय होईल हे त्याला माहीत नसते .जेव्हा माणसाला वाटते माझी इनिंग संपली आहे .सर्व मी मिळवले पण पुढचा क्षण असा काही येतो की माणसाला वाटते माझी खरी इनिंग आता सुरु झाली.जे मिळवायचे त्यासाठी नैतिक मार्गाने प्रयत्न करावा व जे मिळाले ते टिकुन रहावे यासाठी देवाकडे प्रार्थना करावी व जे मिळाले त्याचा चांगला उपयोग करावा.सत्य असे असते की त्याचा नाश कधीच होत नाही व जगात एकच सत्य आहे ते म्हणजे परमात्मा .माणूस दिसतो ,पैसा दिसतो ,पण तो कायम टिकणारा नाही म्हणजे ते असत्य आहे .जीवनात कोणतीच गोष्ट सत्य नाही कारण प्रत्येकाचा लय हा होणार आहे पण असत्याचा आधार घेऊन सत्य शोधणे हे जरा कठीण आहे पण अशक्य नाही.काही विचार पचायला अवघड असतात .स्वत:च्या स्वार्थासाठी विश्वासघात करणारे माणसे सर्वात अज्ञानी असतात कारण विश्वासघात करुन जे सुख आहे ते थोड्याच दिवसांसाठी असते पण नंतर मात्र विश्वाघाताचे फळ हे तर मिळणारच असते तेव्हा माणूस कर्म करुन स्वत:लाच दु:खाच्या जाळ्यात अडकवून घेतो .डरकाळी फोडणारे माणसे शेवटी अंथरुणाला खिळणारे बघितले .उंची पोशाख महागड्या गाड्या विमानात फिरणारे माणसे दवाखाण्याच्या बेडवर दवाखाण्याच्या पोशाखात हतबल झालेले दिसतात म्हणून कोणत्याही गोष्टींचा अहंकार नसावा .अज्ञान हे दु:खाचे मुळ असते .ज्यादिवशी एखाद्या गोष्टीचे संपूर्ण ज्ञान होते तेव्हा सर्व भ्रम गळून पडतो
दगा देवरे
Comments
Post a Comment