Skip to main content

पठारावस्था

पठार अवस्था
प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जेव्हा संपायला येते तेव्हा ही पठार अवस्था संपते व पुन्हा उत्साह येतो व जोमाने परत काम सुरू होते उदाहरण म्हणजे जेव्हा लग्न होते तेव्हा सुरवातीचे काही वर्ष फार उत्साह असतो नंतर मग ही पठार अवस्था येते ना उत्साह वाटत जीवनात ना काही मग काही क्षण आनंदाचे येतात जीवनात व ही पठार अवस्था संपते व पुन्हा जगायला उमेद उत्साह निर्माण होते काही जणांच्या आयुष्यात कायमच पठार अवस्था असते त्यांना उत्साही कधी बघितले नसते कायम मरगळलेले दिसतात पण काहीजणांच्या जीवनात पठार अवस्था ही नसते कायम  उत्साही असतात .पठार अवस्था जर आणायची नसेल तर जीवनात विविध  प्रकारचे बदल करीत राहिले पाहिजे विविध ट्रिपचे नियोजन केले पाहिजे घरात नवीन वस्तू आणल्या पाहिजे घराचा चेहरामोहरा बदलला पाहिजे तेच तेच रूटिन जेव्हा येते तेव्हा पठार अवस्था डोकावते व सारा उत्साह काढून घेते मित्रमंडळींना भेटले पाहिजे नातेवाईक मंडळींना भेटले पाहिजे आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे त्यांना आपल्याकडे बोलवले पाहिजे विविध छंद जोपासले पाहिजे जेणेकरून ही पठार अवस्था यायला नको नाटकं सिनेमा बघितला पाहिजे   .नविन काहीतरी केले पाहिजे रूटीन सोडून मग ही अवस्था लांब राहणार .बघा जमतं का
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...