माणसाची किंमत
प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर आपण पांघरून घालतो .त्याने जे काही आपल्या साठी केले असेल त्याचा आपल्याला विसर पडतो .त्याला भेटण्याची इच्छा असते पण कामाच्या व्यापमुळे आपण त्याला भेटू शकत नाही बर्याच वेळा आपल्या जवळ मोबाईल असूनही त्याला फोन करायचं राहून जाते .त्याच्याशी बर्याच गप्पा माराच्या असतात पण वेळेअभावी राहून जातात.आणि एक दिवस सकाळी किंवा रात्री फोन खणखणतो व तिकडून आवाज येतो की तो किंवा ती गेली व हे ऐकताच आपला आपल्याच कानावर विश्वास बसत नाही काय करावे ते समजत नाही धरती फाटते की काय असं वाटायला लागते .खाण्याकडे लक्ष जात नाही .डोळ्यातून गंगा जमूना वाहायला लागतात .देहभान विसरतो व सरकन त्याच्या बरोबर घालवलेले क्षण आठवायला लागतात .त्याने दिलेली मदत त्याचा पाठिंबा त्याचे ते गोड शब्द कानात रूंजी घालतात .त्याचे ते समजावणे समजून घेणे हे सारेच मनाला भूरळ घालतात तो जीवंत असे पर्यंत हे असं कधी वाटलंच नाही पण त्याच्या मरणानंतर त्याची किंमत वाटायला लागली.जीवंत असेपर्यंत त्याला भेटणं टाळत होतो पण त्याच्या मरणानंतर त्याला भेटण्याची इच्छा तीव्र झाली.पण आता तो तर कधीच भेटणार नाही म्हणून जीवंतपणीच माणसाला माणसाची किंमत द्यावी त्याला भेटावे मनमोकळ्या गप्पा माराव्यात .मन भरून जावं अस भटकायला जावं त्याच्या बरोबर .म्हणजे तो गेल्यावर हळहळ वाटणार नाही.मेल्यानंतर किंमत देण्यापेक्षा जीवंतपणीच त्याला किंमत द्या आदर करा वेळ द्या बघा जमतं का हे सर्व
प्रा. दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
छान
ReplyDeleteछान आणि खरं आहे
ReplyDelete