Skip to main content

झंझट

झंझट

नसावे अंगाशी येणारे कोणते झंझट
मनशांती जाते बिघडून
अस्ताव्यस्त होऊन जाते
सुरळीत चाललेले जीवन

घरातील भांडणे जाताता विकोपाला
अगदी क्षुल्लक कारणाने
राग त्यावेळी नाही आवरला
मन भरुन जाते पश्चातापाने

पैसा संपत्ती याच्या लोभापायी
बरेचजण चक्कर काटतात न्यायालयाचे
जवळ असलेला पैसा जातो
आपली माणसेही  दुरावतात कायमचे

आॅफिसमध्ये जेथे आहे नोकरी व्यवसाय
तेथेही नियमाने शांतीने करावे काम
उगीचच नियमांचा भंग करुन
भ्रष्ट मार्गाने कमवू नये दाम

वरिष्ठांचा मान राखून
शिस्त ही अंगी बाळगावी
कुणाचा अपमान न करतात
अवास्तव अपेक्षा न करावी

चालतांना बोलतांना आपण
मोजून मापून शब्द वापरावे
चौकशीचा फेरा मागे न लागता
शांत जीवन  जगावे

दिवसभर नितीने काम केले
झोप घेते त्याला कवेत
अनितीने काम करणार्‍यांना
कळ येते त्याच्या छातीत

कोणतेही काम करतांना 
नियतीचा असतो आपल्यावर कॅमेरा
याची ज्याला असते जाणीव
त्याच्यामागे कधीच लागत नाही ससेमिरा

कुणाचा हेवा न करता
आपण आपल्या ठिकाणी असतो श्रेष्ठ
आपली किंमत वाढविण्यासाठी
कुणाला मानू नये कनिष्ठ

जो नेहमी जागृत असतो
 त्याच्या वाटेला येत नाही झंझट
नको त्या गोष्टीत वेळ न दवडता
योग्य कामाप्रती असते त्याची लगट

आहे आपण काही दिवसांचे पाहूणे
याचे नेहमी ठेवावे भान
राग द्वेष मत्सर लोभ वासना
यामुळे होऊ नये विचलीत मन

दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...