Skip to main content

वळण

वळण
आयुष्याला कधी वळण मिळेल
हे कुणालाच येत नाही सांगता
काही वळण असते चांगले
तर काही वळण बरबाद करते जाता जाता

माणूस चालता चालता असतो अनभिज्ञ
वळणाची नसते त्याला कल्पना
सावध असलेल्या माणसाला
भिती नसते वळतांना

काळ हा असतो टपलेला
झडप घालतो शिकारीवर
माणूस असतो त्यावेळी हतबल
काहीच उपाय नसतो त्यावर

पैसा संपत्ती पद हे ठरते
काळापुढे अगदी शून्य
माणसाच्या डोक्यातील हवा
नियतीपुढे असते नगण्य

एका क्षणाला माणूस मारतो भरारी
तर दुसर्‍याच क्षणाला पडतो तो धरतीवर
याला काय कारण असावे
हे प्रत्येकाचे आहे वेगवेगळे  मतेमतांतर

काही वळण असते
माणसाच्या आयूष्याचा शेवट
वळणाआधी माणसाने करावा
चांगले काम करण्याचा घाट

एका चुकीची शिक्षा
कधीतरी चुकवावी लागते
कोणत्याही नशेत न राहता
जागृतता महत्वाची असते

आज आहे ते उद्या असेलच
हे सांगता येत नाही
देवाचे नामस्मरण करावे
त्यामुळे माणूस खचून जात नाही

जीवन आहे दोन दिवसाचे
याचे स्मरण नेहमी ठेवावे
कुणीही आपल्याबरोबर नेहमी असणार
ह्या भ्रमापासून दूर राहावे

आपण आहोत प्रवासी
माहीत नाही कधी संपेल प्रवास
प्रवासाचा आनंद घ्यावा
मग कुणाचाही असेल सहवास

दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...