Skip to main content

Posts

Showing posts from March, 2020

महिला दिन

महिला दिन मुलगी येते जन्माला घरात आनंदी होतात  सर्व जण करतात लाड तिचे सर्व भरून जाते आईबाबांचे मन आकर्षक असते तिचे लाजणे मुरडणे दिसते ती सूंदर परी असते हसणे तिचे लोभस भाष्य ती मंजूळ करी घराचा असते ती भक्कम आधार सर्व फिरतात तिच्या अवतीभोवती सर्वांची घेते नेहमी काळजी मनापासून जपते आपली नाती स्रीवाचून पुरूष आहे अपुर्ण आहे ती पुरूषाची शक्ती तिचे नसणे म्हणजे सूर्याविन आकाश म्हणून करावी तिची भक्ती खाते ती धक्के बस ट्रेनचे रोज तरी पोहचते कामाला वेळेवर असतो कामात नीटनेटकेपणा नाही करत त्यात काही कसूर सासर माहेर असते तिचे जग सगळ्यांवर करते ती माया असते ती दोन्ही घरांचा आदर्श आधारस्तंभ असतो तिचा राया स्री म्हणजे आहे सहनशक्तीचा कळस तिच्यात असतो संयम फार जेव्हा शिरते तिच्यात दूर्गा तेव्हा बाकी लोकांनी शांत असलेलें बरं  तिने सुरू केली मुलींची शाळा झुगारल्या वाईट रूढी परंपरा घडवला तिने शिवाजी महाराज थोर म्हणून जग करते  तिला मानाचा मुजरा बनली कधी पंतप्रधान अन् मुख्यमंत्री जिंकते जनता जनार्दनाचे मन बर्‍याच ठिकाणी आहे ती बाॅस हलत नाही तिच्याविना कोणते पान तिने दाखवला खेळात पराक्रम जगाने घे...

कोरोना

कोरोना कोरोनाने अनेकांचे बळी घेऊन जगात हाहाकार माजवला कोरोनापेक्षा भयंकर गोष्टी  ठरतात घातक समाजाला रागानेही अनेकांना जगातून कायमचे संपवले त्याच्याबद्दल कुणी नाही बोलत पण कोरोनाने सगळ्यांना बोलते केले द्वेष मत्सर हे ही आहेत कोरोनापेक्षा भयंकर इतरांचा घात करून जगातून फेकतात त्यांना दूर माणसाचा स्वार्थीपणाही आहे  एक प्रकार कोरोनाचा कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झालेत केला घात आपल्याच लोकांचा भ्रष्टाचार हा काय वेगळा आहे कोरोना  जंतू पेक्षा अर्थव्यवस्थेला हादरा देऊन करतात आपल्याच पूर्ण अपेक्षा देशद्रोह  हा आहे कोरोना सारखाच खतरनाक आपल्याच देशाचे नुकसान करून बळी जातात आपल्या बांधवांचे हकनाक कौटुंबिक हिंसाचार फोफावला कोरोनासारखा समाजात तो कायमचा संपवणे असे नाही कुणाला वाटत चोरी बलात्कार खून मारामार्‍या कोरोनापेक्षा आहेत का हे वेगळे ठाण मांडून बसलेत समाजात ते कुणा नाकळे प्रा. दगा देवरे

मित्

आपल्यातले मित्र देवाने आपले शरीर बनवतांना खूप विचार केला आहे .जेव्हा माणसाजवळ कुणीच नसते तेव्हा त्याला एकटं वाटू नये यासाठी आपला मित्रच आपल्या जवळ आहे पण आपल्याला त्याची जाणीव नाही .दोन मित्र जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा हातात हात घेतात .शेकहन्ड करतात गळाभेट घेतात तेव्हा मनाला आनंद व शांती मिळते पण देवाने आपल्याला दोन हात दिले आहेत कधी विचार केला की आपले हात आपण आपल्याच  हातात घेतले .ज्यावेळी आपण आपले दोनी हात एकमेकांमध्ये ठेवणार किंवा भजन करतांना किंवा कोणत्याही कार्यक्रमात हास्य विनोद करताना टाळी वाजवतो तेव्हा स्पंदन तयार होतात व शरीरात एक प्रकारची उर्जा निर्माण होते.तसेच दोन पाय कधी एकमेकांना भेटतात का? ज्यावेळी ते एकमेकांना स्पर्श करतात त्यावेळीही विशिष्ट प्रकारची उर्जा निर्माण होते  .कधी आपला एक हात व एक पाय .कधी एक हात दोन पाय .कधी दोन पाय एक हात यांची भेट होते स्पर्श रुपी तेव्हा उर्जा शरिरात निर्माण होते व एक प्रकारचा उत्साह आपल्यात निर्माण होतो तसेच दोन डोळे कधी एकमेकांकडे बघतात का ?किंवा तसे त्यांना भेटण्यासाठी आपण प्रयत्न करतो का?तसेच कानांची भेट हवे रुपाने कधी घेत...