Skip to main content

Posts

Showing posts from October, 2020

स्

स्वत:वरील प्रेम राहूनच गेले स्वत:वर मनापासून प्रेम करायचे अडीअडचणींचा सामना करत स्वत:कडे दुर्लक्ष झाले कायमचे भाकरीचा चंद्र मिळविण्यात खर्च झाले बरेच दिवस स्वत:च्या भावभावनांचा कधीच विचार केला नाही खास आपल्या आवडीचा कधीच विचार आला नाही मनात बरेच वर्ष  निघून गेले इतरांचा विचार करण्यात वजन वाढले पोट सुटले झाले दुर्लक्ष माझ्याकडे अनेक आजारांनी डोके वर काढले वेळ निघून गेली आता फार  पलीकडे देवाचे भजन करायचे होते मला वेळेचे गणितच नाही जमलं सारखा धावत होतो मी पण सुख मला नाही कळलं वाचन चिंतन मनन बरोबर शांती साधायची होती मला मी म्हणजे एकटाच ज्ञानी ही भ्रामक कल्पना होती मला निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करायची होती मला मी मी तू तू करण्यातच वेळ मात्र मी वाया घालवला आपल्यावाचून कुणाचचं अडत नाही हे पटलं मला मनापासुन एवढे वर्ष उगीच वाया गेले स्वत:चे जगणं गेले राहून माझ्यासारखे किती आले अन् गेले हे समजण्यास झाला मला उशिर ज्याला योग्यवेळी गुरू भेटला त्याचे नशीब असते मात्र थोर अजुन वेळ गेली नाही हे मला आज कळलं देवाचे मानतो आभार त्याच्यामुळे मला सत्य पटलं प्रा. दगाजी देवरे

दुरुन डोंगर

दुरुन डोंगर साजिरे जर आपण डोंगर बघितला लांबून तर तो एकदम सुंदर दिसतो त्यावर दगड दर्‍या वर खाली असे काहीच दिसत नाही पण जर आपण त्याच्या एकदम जवळ गेलो तर लहान मोठे दगड , लहान मोठ्या दर्‍या ,झाडेझुडुपे असे अनेक प्रकारचे आपल्याला दिसते त्यामुळे दुरुन पाहिलेला सुंदर डोंगर व जवळून पाहिलेला तोच डोंगर यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो तसेच माणसाच्या बाबतीत असते जोपर्यंत माणूस  आपल्यापासुन लांब असतो तेव्हा त्याच्याबद्दल आपल्याला आकर्षण वाटते कारण त्याचे गुण आपले ऐकलेले असतात  .अवगुण जरी असले तरी ते आपण गांभिर्याने घेत नाही फक्त गुणांचाच विचार करतो पण त्या व्यक्तीजवळ जसजसे जवळ जाऊ तसेतसे त्या माणसाबद्दल आपल्याला कळायला लागते व फारच जवळ गेल्याने त्याच्यातले अवगुण दिसायला लागतात व ते अवगुण जास्तच असले तर चांगले गुण झाकले जातात व फक्त आपल्याला अवगुणच दिसतात तेव्हा माणूस बोलू लागतो की तुला मी काय समजले होते व खरा तू वेगळाच आहे त्यामुळे लांब राहून जे प्रेम असते ते जवळ आल्यावर नाहीसे होते म्हणूनच लग्नाआधी जे प्रेम वाटायला लागते ते लग्नानंतर राहीलच याची शाश्वती नसते कारण त्या व्यक्तीमधील अवगुण आपल्...

माझे काय

माझे काय आहे? माणूस येतो जन्माला काहीच हातात नसते घरचेच नाव ठेवतात तेच नाव त्याला चिकटते माझी खेळणी करत करत रमतो माणूस खेळण्यामध्ये हात लावताच दुसर्‍याने पटाईत होतो मारामारीमध्ये माझे कपडे माझे बूट माझा मोबाईल यात गुरफटतो माझे माझे करत करत सगळ्यांमध्ये अडकून पडतो माझे घर माझी गाडी माझे शेत माझे पद यात रमतो माझा संसार माझे पैसे माझी मुले यात शेवटी फसतो मी केले मी करुन दाखवले असा घुसतो शरीरात गर्व माझे शरीर माझी संपत्ती हेच मानतो स्वत:चे सर्व मृत्यू जेव्हा मारतो झडप तेव्हा शरीरही नसते स्वत:चे माझे माझे राहते सर्व जागी मग आपण नक्की कुणाचे ज्याला म्हणत होते माझे माझे तेच काढतात घराच्या बाहेर  कवटी फुटली कळल्याशिवाय गाठत नाही ते आपले घर जो आपला आहे खरा त्याच्याशी राहतो आपण दूर तोच असतो आपला सखा त्याचे नाव आहे परमेश्वर दगा देवरे

गड्

गड्या आपुला गावच बरा मित्रहो आपण जे घडतो ते आपले लहानपण कसे गेले यावर अवलंबून असते .जे गावाने अनुभव दिलेत ते कुठेच मिळू शकत नाही हे मात्र नक्की.शहरातील मुलांना जे मिळत नाही ते सहजच मला मिळत गेले पण तेव्हा त्याची किंमत नव्हती.आज मात्र त्याची खूप किंमत वाटते मग लहानपणी विटू दांडूचे खेळ असो लपाछपीचे खेळ  झाडांवर चढणे उतरणे त्यांचे खेळ हे आजही आठवतात .मला आठवते लहानपणाचा एक माझा मित्र होता त्याची आज आठवण येते मी होतो तेव्हा पाचवी सहावीला व माझा मित्र 60 ते 65 वर्षाचा त्यांचे नाव होते चिंधू कासार .आमच्या घराजवळच राहायचे संध्याकाळी आरती करायचे व मला बोलवायचे व मीही त्यांच्याबरोबर आरती करायचो म्हणजे कळत नकळत देवाचे संस्कार मनाच्या पटलावर उमटत होते व  आज त्याचा किती उपयोग झाला ते शब्दांत सांगणे कठिण .आईवडील वारकरी पंथाचे असल्याने सतत किर्तन प्रवचन संताच्या कथा तासनतास घरात चालायच्या त्यामुळे देवाबद्दल आकर्षण वाटायला लागले .कठिण परिस्थितीत कसे जिंकायचे ते कळले .          निताणे गावाभोवती सगळीकडे डोंगर आहेत त्या डोंगरावर म्हशी गाई बकर्‍या यांना चारायला घेऊन जायच...

निवृती

निवृत्ती प्रत्येकजण होतो निवृत्त आपल्या असलेल्या नोकरीतून ती नक्कीच घडणार असते इच्छा नसतांना मनातून निवृत्त करावे आपल्याला लागलेल्या व्यसनाला कधीच फिरकू देऊ नये कायमची मुठमाती द्यावी त्याला शंका गैरसमज स्वार्थीपणा यांना करावे निवृत्त मनातला कचरा करावा दूर त्याने होईल मन शांत आजारांना करावे निवृत्त योगा प्राणायाम करुन नित्यनेम जरुर ठेवावा चांगल्या सवयी लावून निवृत्त करावे कायमचे पुढे आलेल्या पोटाला खाणे नियंत्रित ठेऊन कधीतरी आराम द्यावा त्याला निवृत्ती द्यावी मनात येणार्‍या वाईट विचारांना चांगल्या विचारांना मिळेल जागा त्याचा होईल उपयोग ध्यान करतांना निवृत्ती द्यावी  कायमचीच आपल्या निरर्थक बडबडीला शब्द वापरावा जपून महत्व द्यावे कधीतरी मौनाला निवृत करावे आळसाला चांगल्या कामात गुंतवून नेहमी राहावे हसतमुख त्याने दु:ख जाईल पळून निवृत्त करावे दुसर्‍याची निंदा करणार्‍या विचारांना कौतुकाचे शब्द यावेत मुखी त्याने आनंद होईल दुसर्‍यांना निवृत्त करावे मनातून नकारात्मक दृष्टिकोनाला दुनिया दिसू लागेल चांगली जेव्हा सकारात्मक दृष्टी लाभेल आपल्याला दगा देवरे