Skip to main content

Posts

Showing posts from May, 2024

खरा धोका

खरा धोका आपण जीवनात अनेक धोके खातो कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी शत्रूंकडून त्रास पण ही आपत्ती व शत्रूंकडून त्रास हा आपण गृहीत धरलेला असतो व त्याविरुद्ध लढण्याचे बळ आपल्याला मिळत असते व आपण लढतो पण खरा धोका जर कोणता असेल तर आपल्या लोकांकडून ज्यांना आपण आपले मानले मग ते नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील .आपण आपल्या त्रूटी सर्व सांगून मोकळे होतो .आपण केलेल्या चुका आपण सांगून मोकळे होतो म्हणजे आपण आतबाहेर जे असतो ते सर्व आपण ज्यांना आपले मानले त्यांना माहीत असते .आपल्यातील गुप्त गोष्टी आपण सांगून मोकळे होतो व तेव्हा आपल्याला छान हलके वाटते पण काही दिवसांनी आपण ज्यांना आपले मानले त्यांच्यात व आपल्यात काही गोष्टींनी बिनसले म्हणजे मी मी तू तू झाले तर ज्यांना आपले मानले ते शत्रू होतात व मग आपल्याबद्दल ज्या गुप्त गोष्टी आपण त्यांना सांगितलेल्या असतात त्याचे ते आपली बदनामी करण्यासाठी भांडवल तयार करतात व वेळ आली तर आपल्याला उघडे पाडतात तेव्हा आपल्याकडे पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही .ते कोणताही विचार करत नाही की कुणीतरी आपल्यावर विश्वास असल्यामुळे सांगितले आहे पण त्या विश्वासाचा चक्काचूर ह...