राग मारी वाघ मारी राग असतो गड्या जीवनात फार घातक मनाच्या कोपर्यात असतो दडून बाहेर पडताच असतो मारक रागाने लावली भल्याभल्यांची वाट केली आयुष्यांची राखरांगोळी स्वप्नांचा करतो क्षणार्धात चुराडा वाट बघतो बाहेर येण्याची प्रत्येकवेळी बदला घेण्याच्या मुळाशी असतो राग माणूस विसरतो तेव्हा सारासार त्या एकाच क्षणासाठी मन बनते माणसाचै सैरभैर तुरुंगात खितपत पडलेत गुन्हेगार ऐन आयुष्यांच्या तरुणपणी माणसाचा जन्म गेला त्यांचा वाया ह्या सुंदर आयुष्यांच्या जीवनी सारे जग आहे माणसाला जीवनात आनंद घेण्यासाठी रागाने कोंडले जेलच्या चार भिंतीत केलेल्या कृत्याचा पश्चाताप करण्यासाठी राग दिसत नाही माणसाला क्षुल्लक कारणांनी करतो माणसावर मात प्रत्येकक्षणी माणसाने सावध राहून त्याच्याशी करावी शांत मनाने बात सुंदर चालले असते आयुष्य रागाने होते क्षणार्धात उध्वस्त कुणीतरी जवळचा असावा मित्र ज्याच्याजवळ व्हावे माणसाने व्यक्त राग जेव्हा येतो माणसाला प्रिय व्यक्तीच्या जीवावर माणूस उठतो ज्यांचे असतात अनंत उपकार त्यांनाच माणूस संपवतो रागाने जातो माणूस आपल्याच माणसांपासून लांब सर्व नाते तोडून म्हणतो माझीच खरी बाब अन्यायाबद्दल या...