Skip to main content

Posts

मन वढायं वढायं

मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं बहिणाबाईंनी मनाचे वर्णन फार चांगल्या प्रकारे केले आहे.मन माणसावर नेहमी आरुढ होत असते.जसे मन सांगेल त्याप्रमाणे माणूस वागत असतो .मनामागे माणूस फरफटत जातो .जर मनाचे विचार चांगले असतील तर मग चांगला मार्ग सापडतो व माणसाचे कल्याण होते पण जर मनातील विचार चांगले नसतील तर मग मात्र माणसाचे अतोनात नुकसान होते .छोट्या छोट्या गोष्टीवरुन मन माणसाला उकवसते व त्याचे रुपांतर भांडणात होते व अनर्थ घडतो .पाणी जसे नेहमी उताराकडेच धावते तसे मन हे नेहमी वाईट विचार करण्यात मग्न असते .पाण्याला वरच्या बाजूने नेण्यासाठी विशिष्ट मशिनचा उपयोग करुन चढवले जाते त्याचप्रमाणे मनात चांगले विचार हे आपोआप येत नाहीत तर प्रयत्नपूर्वक त्यात आणावे लागतात .त्यासाठी अनेक मार्ग आहेत .मनाची एक गोष्ट खूप चांगली आहे ती म्हणजे जर काही दिवस एकच गोष्ट नेहमी करत राहिलो तर ती अंगवळणी पडते व मन करायला तयार होते .चांगली गोष्ट असेल तर चांगलेच होते पण वाईट गोष्ट अंगवळणी पडली तर मग मात्र माणसाचे पतन होते.काही दारू, सिगारेट तंबाखू, बिडी, गूटखा खाण्याची सवय लावून घेतात व  ब्लू फिल्म ,वासना चाळवणारे व्हिडिओ ...

समाजातील भयानक चित्र

समाजातील भयानक चित्र आजषौ" तरुण मुलामुलींचे भयानक चित्र समाजात दिसते आहे .तरुण व तरुणींचे शिक्षण पूर्ण झाले पण नोकरी नाही त्यामुळे लग्न नाही .लग्नाचे 25 वय कधीच उलटून गेले .काहींचे तीस पस्तीस ही उलटून गेले पण मुलगी मिळत नाही .जे तरुण नोकरीला आहेत त्यांना स्वत:चे घर आहे का गाडी आहे का जमीन आहे का व पॅकेज भक्कम आहे का असे प्रश्न विचारले जातात .एखादा मुलगा इंजीनिअर असेल किंवा शिक्षक असेल किंवा आणखी कोणत्या खात्यात असेल तर त्याला त्याच्या education सारखी मुलगी पाहिजे असेल तर ती जमीन ,घर ,पॅकेज  चांगले असेल तरच होकार देते म्हणून मुलगा जरी नोकरीला असेल तरी त्याला हवी असलेली त्याच्या खात्यातली मुलगी मिळणे अवघड झाले आहे मग ज्यांना नोकरी नाही त्यांचे तर विचारुच   नका व त्यातून शेतकरी मुलांचा प्रश्न बिकट झाला आहे .पालकांची झोप उडाली आहे 30-35 वर्ष झालीत पण मुलगा व मुलगी बिन लग्नाचे व काही बिन नोकरीचे घरात आहेत .काय करावे काही सुचत नाही 30-35 वर्षात पालकांचा अर्धा संसार झालेला होता पण मुलांची सुरवातच झाली नाही जीवनाला या चिंतेने त्यांना ग्रासलेले आहे यातून मार्ग निघण्याचे मार्ग बंद ...

झोपलेला राक्षस

झोपलेला राक्षस प्रत्येक माणसामध्ये चांगला व वाईट विचार करण्याची क्षमता असते .जसे आपण विचार करणार तसे आपले इंद्रिये प्रभावित होतात व कार्य करायला लागतात .जसे की एखादे भजन आपण ऐकले की आपले मन एकाग्र होऊ लागते .भक्तीभावाने संपूर्ण अंग रोमांचित होते व मन उत्साहाने भरुन जाते पण जर आपल्या मनात एखाद्याबद्दल राग असेल व तो विचार केला तर आतून सुडाची भावना निर्माण होते व तो आत झोपलेला राक्षस त्या आपण केलेल्या विचारांनी जागा होतो व कोणत्या प्रकारे सूड घ्यायचा अशा विचाराने आपण बेचैन होतो तसेच एखाद्याच्या मनात वासना निर्माण झाली तर त्या विचारांनी मन सैरभैर होते मग अत्याचार बलात्कार यासारख्या घटना घडतात .आपण नको ते विचार करुन आत झोपलेल्या राक्षसाला उठवतो व तो जागा झाल्यावर अनेक वाईट कृत्ये घडवून आणतो  व सर्व शांत झाल्यावर तो झोपतो व तोपर्यंत त्याने आपल्याला व  समोरच्याला बरबाद करुन टाकलेले असते त्यामुळे रावण बाहेर नाही आपल्यातच आहे .काहींचा तो कायम जागा असतो तर काहींचा झोपलेला असतो .त्याला जागे होण्यासाठी विचाररुपी खतपाणी आपणच घालत असतो म्हणून मनात वाईट विचार येत असतील तर ते लगेच काढणे सोपे ...

cod connection

connection परमेश्वर नेहमी आनंदी समाधानी असतो .आपण त्याचाच एक अंश आहे .ज्यावेळी आपण आनंदी समाधानी असतो तेव्हा समजावे की त्याच्याशी आपले connection जुळलेले आहे .तो म्हणजे input व आपण असतो output .input व output मध्ये connection असेल तर जे input मध्ये आहे ते output मध्ये नक्की येणार पण जेव्हा त्या connection मध्ये कचरा साठला असेल तर त्याने कितीही input पाठवले ते output पर्यंत येऊच शकणार नाही .आपण संसारातील राग द्वेष मत्सर चिंता हेवेदावे  लालसा बदला याने एवढे भरुन गेलेलो आहोत की त्याच्याकडून येणारा आनंद समाधान आपल्यापर्यंत पोहचू शकत नाही त्यामुळे आपण नेहमी छोट्या मोठ्या गोष्टींनी दु:खी होतो व सर्व असूनही समाधान आपल्याला मिळत नाही कारण input व output मध्ये जी cod असते ती  संसारातील अवगुणांनी  खराब झाली आहे किंवा तुटली आहे म्हणून परमेश्वराकडून आनंद व समाधान आपल्यापर्यंत पोहचू शकत नाही त्यामुळे ज्याचे  connection त्याच्याशी जुळलेलेले असते तो माणूस जीवनात नेहमी प्रसन्न आनंदी समाधानी दिसतो.कोणत्याही गोष्टीनी तो विचलीत होत नाही कारण connection असल्यामुळे त्याला एक भक्कम आधार व...

फक्त एक दिवस

फक्त एक  दिवस qqqआपल्याला एका दिवसाचे महत्व दैनंदिन जीवनात काहीही नसते पण असे काही घडते की त्यामुळे आपल्याला त्यासाठी फक्त एक दिवस हवा असतो.आपल्या माणसांना आपण गृहीत धरत असतो .आपल्याशिवाय त्याला कोण आहे व तो आपल्याकडेच येणार कुठेही जाणार नाही अशा भावनेने आपण त्या व्यक्तीशी  वागत असतो .त्या व्यक्तीने आपल्याकरिता कितीही चांगले केले असेल तरी त्याची आठवण आपण ठेवत नाही व qqत्याबदल्यात त्या व्यक्तीवर प्रेम, तिची काळजीq ,तिला काय हवे व काय नको याचा विचारही आपल्या मनात नसतो .तिने जे केलेले असते त्याची कदर आपल्याला नसते .आपण वेगळ्याच धुंदीत वागत असतो .त्या व्यक्तीने आपल्याजवळ एखाद्या गोष्टीची मागणी केली तर आपण त्या मागणीकडे कानाडोळा करतो व  आताच कशाला हवे ,करु नंतर कधीतरी अशा विचारात असतो असे त्या व्यक्तीबरोबर अनेक वर्ष निघून जातात पण तिची किंमत आपल्या ध्यानीमनी नसते मग एक दिवस अचानक ती व्यक्ती आजाराने ,अपघाताने आपल्यातून निघून जाते .आपण कधीही कल्पना केलेली नसते की अचानक ती निघून जाईल म्हणून मग आपले डोळे खाडकन उघडतात व त्या व्यक्तीचे महत्व आपल्याला जाणवायला लागते .तिची पोकळी आपल्य...

आनंद

आनंद आहे कुठे प्रत्येक व्यक्तीला आनंद पाहिजे असतो पण खरा आनंद कसा मिळवावा हे मात्र माहीत नसते .भौतिक गोष्टी जमविण्यात माणसाला आनंद वाटतो पण तो आनंद टिकत नाही कारण भौतिक गोष्टी कधीतरी बिघडतात व त्यावेळी त्याला दु:ख होते म्हणून भौतिक गोष्टी कायमस्वरुपी आपल्याला आनंद देऊ शकत नाही तसेच काही व्यक्तींमूळे आपल्याला आनंद होतो पण तो ही टिकत नाही कारण ती व्यक्ती आपल्यापासून कधीपण दूर जाऊ शकते काहीतरी बिनसल्यामुळे किंवा या जगातून ती व्यक्ती गेल्यामुळे. मग व्यक्तीमुळे ,भौतिक गोष्टीमुळे आनंद कायम राहत नाहीत बर्‍याच वेळा ज्या गोष्टी आपल्या खूप जवळ असतात मग त्या व्यक्ती असो नाहीतर वस्तू त्या जास्तीत जास्त आपल्याला त्रास देतात किंवा त्यांच्याकडून दु:ख मिळत राहते कारण  त्या आपल्याजवळ असल्याने आपण जास्त अपेक्षा धरतो व त्या अपेक्षांची पूर्ति झाली नाही की मग आपल्याला दु:ख होते .आता खरा आनंद कोणापासून मिळेल याचा विचार करु.खरा आनंद आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो .आपण त्या गोष्टीचा कसा विचार करतो कोणत्या बाजूने विचार करतो यावर अवलंबून असतो .प्रत्येक गोष्टीत चांगले व वाईट असते तर आपण जर चांगले बघण्याचा ...

हसरा चेहरा

हसरा चेहरा काही जण असतात गंभीर जसे जगाचे संकट त्यांच्यावरी हसणे त्यांना नसते माहीत सतत दिसते चिंता चेहर्‍यावरी आपला चेहरा हसरा ठेवणे  त्यांना वाटते आपला वचक जाणे आपल्याला बघितल्यावर सतत दुसर्‍याला आपली भीती वाटणे हसरा चेहरा असतो चांगल्या आरोग्याची पावती आपला हसरा बघून जुळतात दुसर्‍याशी चांगली नाती माणूस आतून असेल आनंदी त्याची झलक दिसते चेहर्‍यावर उगीचच कोणते टेंशन न घेता विरझन घालू नये आपल्या आनंदावर बरेच बाॅस लोक  विसरतात खूर्ची मिळाल्यावर हसणे सतत कामाचे ओझे घेऊन विसरतात खरे जीवन जगणे हसरा माणूस प्रत्येकाला हवा हवासा नेहमी वाटतो गंभीर माणसापासून प्रत्येकजण दोन हात लांबच राहतो माणसा जवळ असावी कला सर्व परिस्थितीत आनंदी राहण्यासाठी देव काढत असतो सतत फोटो छान अल्बम तयार करण्यासाठी लहान मुल प्रत्येकाला आवडते कारण ते असते सतत हसत निरागस त्याचे हसणे बघून आपल्याला भान विसरायला होतं काही माणसाचे हसणे असते कृत्रिम दुसर्‍याला फक्त दाखविण्यासाठी दुसर्‍याला नेहमी कमी दाखवून हसतात फक्त खिजविण्यासाठी हसण्याला असावी मर्यादा लोक काढतात वेड्यात हसण्याने होऊ नये दुसर्‍याला त्रास याचे भान ठेवाव...