दुखा:चे कारण attachment
बर्याच वेळेला आपल्याला दुख: होते ते attachment मुळे .ज्या व्यक्तीशी मनाने ह्यदयाने जोडले गेलेलो आहोत तेच व्यक्ती जर आपल्याशी नीट वागल्या नाहीत तर आपण दुखी होतो एखाद्या कार्यक्रमाला आपल्याच व्यक्तीनी नाही बोलवल. किंवा मान सन्मान नाही दिला तर आपल्याला फार वाईट वाटते .बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये कुणाशी भांडण झाले शिवीगाळ झाली तर आपण दुसर्या दिवशी विसरतो पण तेच आपल्या माणसांबरोबर झालं तर जन्मभर आपण लक्षात ठेवतो कारण ट्रेनमधील लोकांशी आपण मनाने जोडले गेलेलो नव्हतो म्हणून आपल्याला दुख झालेले नाही.परक्या माणसाने फसवले तर आपण विसरतो पण आपल्याच माणसाने फसवले तर मनाला यातना होतात .दुसर्याचा मुलगा आपल्याशी कसाही वागला तर आपल्याला काही वाटत नाही पण आपला मुलगा आपल्याशी विपरित वागला तर रात्रभर झोप लागत नाही .
आपल्याला झोपेनंतर शांत वाटते कारण झोपे मध्ये आपण शरीराला पूर्ण विसरतो .मन त्याच्यापासून अलग होते .म्हणून जोपर्यंत एखाद्याशी जोडलेले असणार तोपर्यंत सुख अन दुख होतच राहणार .अलिप्त ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी मनाने होणार तरच तुम्ही सुख व दुखाशी त्याच्याशी समरूप होणार नाही detachment होणे फार अवघड गोष्ट आहे व संसारी माणसाला तर अशक्यच तरी प्रयत्न करून बघितले तर बर्याच गोष्टीपासून अलिप्त राहून आपण सुख दुखापासून अलिप्त राहू शकतो बघूया प्रयत्न करून आपल्याला थोडफार प्रमाणात जमत का.अलिप्त होणे म्हणजे संबंध तोडणे नव्हे .कमळ पाण्यामध्ये राहते तसे .सूर्यामूळे जग चालते पण जगाने काहीही शिव्या दिल्या तरी त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही कारण तो अलिप्त आहे .आपल्याशी आपल्या माणसांचे पानही हलणार नाही पण सूर्यासारखे अलिप्त राहून काम करता आलं पाहिजे मग मात्र आपल्या मनात दु:ख प्रवेश करूच शकत नाही .बघूया जमत का
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment