माणूस कितीही मोठा झाला तरी तो घरात सामान्यच असतो म्हणजे घरची मंडळींना त्याबद्दल विशेष वाटत नाही.स्वताच्या कामाच्या ठिकाणी प्रत्येकाला काही किंमत नसते पण तीच व्यक्ती जर बाहेर ठिकाणी गेली तर किती तरी मानाने वागवतात .म्हणजे जेथे पिकते तेथे विकले जात नाही. नेते परदेशात जातात तेव्हा महान नेता म्हणून सर्व आदर सत्कार करतात पण भारतातील लोकांना खरंच तसे वाटते का? माणूस मोठा क्लास वन आॅफिसर असतो पण घरात किंमत कमी पण बाहेर साहेब साहेब म्हणुन डोक्यावर घेतात.असं का होतं.एखादा मोठा लेखक असतो पण घरातील लोकांना वाटतो काहीतरी टाईमपास करतो पण बाहेर प्रमुख अतिथी म्हणून बोलवतात व सन्मान करतात.घरात किर्तनकर बाबांच कुणी उपदेश ऐकत नाहीत पण बाहेर त्यांचे विचार ऐकण्यासाठी हजारोंची गर्दी जमते.घरातील लौकांना आपला मुलगा फार मोठा ज्ञानी आहे असे वाटत नाही तसेच प्रत्येक मुलाला आपले पालक खूप ज्ञानी असे कधीच वाटतं नाही पण बाहेरच्या लोकांना केवढे अप्रूप वाटते व कौतूक वाटते.प्रत्येक बायकांना आपला नवरा बुध्दू वाटतो .असे का?असे अनेक उदाहरणे आहेत त्याचे कारणे सांगतो
कारण आपण एखाद्याच्या फार जवळ जेव्हा असतो तेव्हा त्याचे सर्वचगुण आपल्याला कळतात.विशेष म्हणजे वाईट गुण कळतात व तेच डोळ्यासमोर आपण ठेवतो बाहेरच्या व्यक्तींना फक्त चांगलेच गुण माहीत असतात म्हणून ते किंमत देतात.असे मला वाटते .तुमचं मत वेगळं असू शकेल .विचार करा व बघा काय वाटतं तुम्हाला
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment