पाऊस
ये रे ये रे पावसा।
नको रूसून बसू असा।।
तुझ्याविना झाले सर्व वाळवंट।
सोड सारा तुझा बालहट्ट।।
शेतकर्यांचे डोळे लागले आकाशाकडे।
वाट तुझी पाहून झाले सर्व वेडे।।
पावसात भिजण्यासाठी मुले झाले आतूर।
सांग ना किती आहे अजून तू दुर।।
चारापाण्यासाठी गाईगूरे झाले कासाविस।
रात्रंदिवस तुला हाक मारतात पाऊस पाऊस।।
पक्षी घरटे बांधण्यासाठी अजून थांबले।
तुझी वाट बघून सर्वजण थकले।।
नदी नाले तलाव विहीरी झाल्या कोरड्या।
असा अंत बघून नको आवळू नाड्या।।
सर्वांचा आनंद आहे तुझ्या हाती।
नको करू सगळ्यांच्या मनाची माती।।
गर्जना करत होऊ दे विजांचा कडकडाट।
ऐकू दे सर्वांना तुझ्या ढगांचा गडगडाट।।
दिसू दे शेती रानमाळ हिरवे हिरवेगार।
सेल्फी काढण्यासाठी होतील सर्व तयार।।
ये रे ये रे पावसा।
नको अंत पाहू असा।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment