प्रत्येक क्षेत्रामध्ये कामचुकार माणसे असतातच.जबाबदारीचे काम टाळण्यात त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही.पण काम कसे टाळावे किंवा कामात टाईमपास कसा करावा हे यांच्याकडून शिकावं पगार तर वेळेवर पाहिजे असतो पण तो का मिळतो हामात्र विचार करत नाही.काम न करता पगार मिळाला तरी त्यांना काही वाटतं नाही.त्यामुळे इतर लोकांवर त्याचा परिणाम होतो.कामावर कधीही त्यांच प्रेम नसते .करायचं म्हणून करतात.प्रत्येक वेळी मीच का करावं मलाच का दिले अशा सतत कुरबुरी चालू असतात.त्या कुरबूरी मुळे इतर लोकांचा रोष ही लोक ओढून घेतात .पगार मात्र वेळेवर पाहिजे असतो. सतत लेट येणे .वेळेवर दिलेले काम न करणे.प्रत्येक वेळी चालढकल करणे.इतरांशी तुलना करणे.रिकामा टाईमपास करणे व काम दिले की मग कटकट करणे.ज्या नोकरीमुळे आपल्याला समाजात मान मिळतो व आपले घर चालते तिचाच असा अपमान केला जातो.काम तेथे न करता टाळाटाळ केली जाते.कुणी सांगितले तेवढ्यापुरते दाखवायचं पण करायचच नसतं.करायच तर मग एकदम slow करायचं पण त्याने पूर्ण खात्याला बदनाम व्हावे लागते.ज्या दिवशी काम नसेल तो दिवस यांचा आनंदाचा.आपण आज काहीही काम केल नाही याचे काहीही सोयरसूतक नसते.काहीजण तर नोकरीची जागा खाण करण्यासाठी येतात .दारू सिगारेट पान तंबाखू खायची व तेथेच थूंकायचे जणू काय हे खाण करण्यासाठीच यांना नोकरी लागली की काय.नोकरीचा किंवा पदाचा गैरवापर करणे .पैसे कमवणे कोणत्याही प्रकारे हे ध्येय मानतात.लाज शरम हे यांचे मेलेली असते .माणूसकी नावालाही नसते.बिगरओळखीच्या माणसाला तर उभेही करत नाही.बोलताना जशी काय जीभ तिरसट बनलेली असते.
विचार करा तुम्हीही असं करता का? कामचुकारपणा व पदाचा गैरवापर तर करत नाहीत ना .नोकरीच्या ठिकाणी व्ससन तर करत नाही ना.गोड शब्द आटले तर नाहीत ना .कुणावर अन्याय तर करत नाही ना.बघा जमत का
प्रा.. दगा देवरे
Comments
Post a Comment