महागाई मार्कांची
सर्वच झाले महाग आता .आमच्यावेळी 70% मार्कस मिळाले तरी फार वाटायचे .काहीतरी पोराने नाव काढले असे पालकांना वाटायचे व सायन्सला सहजच प्रवेश मिळायचा पण आता 70% ला आर्टसलाही प्रवेश मिळत नाही .मुलाला 89% जरी मिळाले तरी पालकांना वाटते 90% च्या पुढे मिळायला पाहिजे होते एखाद्याला 80% जरी मार्कस मिळाले तरी हळहळ व्यक्त करतात की कमी मिळाले .मार्कांची पण महागाई वाढली.बर्याच काॅलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी 90% च्या पुढेच मार्कस लागतात म्हणून 90% पेक्षा कमी मिळाले तर सर्वाना वाटते की कमी मिळाले .म्हणून हा सर्व आकड्यांचा खेळ आहे 90% मार्कस मिळाल्यानंतर पालक व मुले एकदम झाडावर चढतात खाली उतरायला तयार नसतात मग अकरावीला enjoy करतात .भ्रमात राहतात की आपण खूप हूशार आहोत यामध्येअकरावी वर्ष संपते .बर्याच वेळेला ज्या मुलांना दहावीला 90% मार्कस मिळाले होते ते चक्क अकरावीला नापास होतात कारण पालक व मुले भ्रमात राहतात की आपण अभ्यास नाही केला तर सहज पास होऊ मग त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटतो व झाडावर चढलेले पालक दणकण आपटतात .काही अकरावी कसेतरी पास होतात पण बारावीला मग त्यांची हालत होते कारण बारावीचा बेसिक भाग अकरावीमध्येच आहे व अकरावीला अभ्यांसाकडे लक्षच दिलेले नसते मग बारावीला चक्क 50 ते60% मिळतात की ज्यांना दहावीला 90% पेक्षा जास्त मार्कस होते. म्हणून जास्त हरवून न जाता जमिनीवर रहा व पुढचा मार्ग ठरवा व दहावीच्या मार्काचे भूत खाली उतरवा व पुढील दोन वर्ष जोमानेअभ्यास करा व चांगले यश मिळवा .दहावीला मिळालेल्या गुणांची हवा डोक्यातून काढून टाका कारण दहावीला जेवढे सायन्सचे बुक व अकरावी व बारावीचे बुक बघा म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल.class वाले तर फक्त पैसे कमवायला बसलेत .कोणताही class लावा अगर लावू नका पण स्वता जोपर्यंत चांगला अभ्यास करत नाहीत तोपर्यंत काहीच होनार नाही self study ची सवय लावून घ्या व अभ्यासात झोकून द्या तरच यश मिळेल .मी फक्त सावध करतो आहे बघा जमत व रूचतं का
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment