खोटे बोलणे हिताचे
बर्याच वेळा असं सांगितलं जात की खोटे बोलणे पाप आहे पण सर्वच खरे बोलायला निघालो तर जगात संसारात हाहाकार माजेल .समोरच्या व्यक्तीवर आपला फार राग असतो मनात शिव्या असतात पण तो समोर आला की आपण गोड गोड बोलतो सर्व राग आत दडवून.हे न करता त्याला शिव्या द्यायला सुरूवात करा व तो तुमच्या दृष्टीने किती नालायक आहे ते सांगा पण आपण हे करू शकत नाहीतेव्हा खोटे बोलणे हे त्यावेळी खर्यापेक्षा लाख मोलाचे असते .बरेच लोक असतात मुंबईला व फोनवर सांगतात मीआहे out of town.काही व्यक्ती तर एवढ्या सरस असतात की खरं अन खोट काहीच सांगू शकत नाही पण काहीना खोटं बोलताच येत नाही बोलायला लागले की त्यांच्या चेहर्यावर दिसते.काही जण खोटं बोलून जातात पण आतून त्यांना ते बोचते व स्वतालाच त्रास होतो .खोटं बोलण्यामुळे बरेच लोकांचे आपण मन दुखवायचे वाचवतो व संबंध तुटण्यापासून वाचतात पण समोरच्याला जरा जरी शंका आली तर मात्र ते आपल्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीत .ज्यामुळे कुणाचे नुकसान होणार नसेल व मन दुखावणार नसेल तर काही हरकत नाही खोटं बोलले तरी.म्हणून बोलले जाते की सत्य कटू असते व ते पचवणे कठिण असते .तुम्हीच विचार करा की सकाळ पासून रात्री पर्यंत किती खरे बोललात.खरे व खोटे हे भाऊ भाऊ आहेत परिस्थिती बघून दुसर्याचे हित बघून खोटं बोललं ते खर्या एवढेच मोलाचे असते पण स्वताच्या स्वार्थासाठी व दुसर्याला फसवण्यासाठी जे खोट बोलतात ते फार वाईट असते .म्हणून खरं व खोट कसे केव्हा व कधी आणि कुणाबरोबर बोलावे याचाही सारासार विचार करावा .काही तर कधीच खरं बोलत नाहीत .अशा व्यक्ती शेवटी थापाड्या म्हणून प्रसिध्द होतात.
तुम्हीच ठरवा खोट व खरं बोलणे.मला एवढंच म्हणायचं आहे की तुमच्या खोट बोलण्यामुळे दुसर्यावर संकट येता कामा नये .तुमच्या खोट बोलण्याने तुमची व दुसर्याची प्रगतीच होणार असेल कुणाचं नुकसान व मन न मोडता तर ते खर्याहून श्रेष्ठ होय .काही खोटं सत्यापेक्षा श्रेष्ठ असते .काहीवेळा लाज लज्जा खोट्यामुळे झाकली जाते.तुम्हीच ठरवा कधी काय बोलायचं.मीतुम्हाला खोट बोलायच शिकवत नाही तर वस्तूस्थिती सांगतो व संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सुचवतो .खर व खोट हे जगात कसे हातात हात घालून चालतात ते पहा व स्वताचे परिक्षण करा की आपण खोट बोलण्यामुळे दुसर्याचं नुकसान तर झालनाही ना .आपल झाल तरी चालेल पण दुसर्याच होता कामा नये.
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment