Skip to main content

शिक्षणसेवक ते शिक्षक

शिक्षणसेवक ते शिक्षक
लहाणपणी बरेच जण स्वप्न बघतात शिक्षक होण्याचे त्याप्रमाणे मग शिक्षक होण्यासाठी कोणता मार्ग असतो तो निवडतात ग्रॅज्यूएट पोस्टग्रॅज्यूट होतात मग बीएड करतात अशा प्रकारे पदवी प्राप्त करतात सर्व हालअपेष्टा करून पण खरे हाल तर पुढे आहेत नोकरी साठी हा पेपर बघ तो बघ पण कुठेच जागा दिसत नाही सकाळ संध्याकाळ तोच धंदा पेपर बघणे  इकडे अर्ज टाक तिकडे टाक बर्‍याच  ठिकाणी जाहिरातीचे नाटक करतात व आपलेच माणसे भरतात .मुलाखतीचा मग एखादा काॅल येतो फार आनंद वाटतो तेथे गेल्यावर बघतो तर काय एका जागेसाठी पन्नास लोक आलेले असतात त्यामूळे भ्रमनिरास होतो  .इकडे तिकडे फिरून माणूस वैतागतो पण नौकरी मिळत नाही  .निराश होतो व नोकरीची आशा सुटते की काय असे वाटायला लागते .नोकरी नाही म्हणून लग्न करू शकत नाही .स्वताचेच पोट भरण्याची मारामारी लग्न करून काय करणार ऐन तारूण्य ह्या नोकरीच्या नादात होरपळून जाते इच्छा असूनहु लग्न करता येत नाही .काय करावे ते समजत नाही. वय वाढत जाते मग एका ठिकाणी निवड होते ती निवड हूशारीने किंवा ओळखीने किंवा अजून कोणत्या मार्गाने हौते मग आनंदाला पारावार नसतो .तो सर्वकडे दवंडी पिटवतो नोकरी लागली म्हणून .आईवडिल त्याच्या लग्नाचे स्वप्न बघायला लागतात परंतु हातात पडतो पगार 9000 शिक्षण सेवक म्हणून .इतरांसारखेच काम पण पगार मात्र नगण्य.इतरांना त्याच कामाचे 50000 ते 100000 पर्यंत पगार व यांना फक्त 9000 .मग त्यात रूमचे भाडे जेवण  स्वताचा खर्च ह्या सर्वांना तो पगार अपूर्ण पडतो .मुंबई सारख्या शहरात 9000 म्हणचे pocketmoneyच.
     पुन्हा मग लग्न करुन कस चालेल .थांबा परत तिन वर्ष  मग  3 0 वर्ष क्राॅस होते  तो 35 कडे झुकु लागतो .मुलिचा बाप म्हणतो मुलगा permnent  पाहीजे मग शिक्षक सेवक संपते .त्याला आनंद वाटतो परत नऊ महिने पगार नाही .मंजुरीला वेळ लागतो .कस भागवायचे हाप्रश्न पडतो यातना थांबायला तयार च नाही मग फुल पगार  चालु  होतो .लग्नाचे मग स्वप्न बघू लागतो .मूलगी मिळते लग्न होते .घर स्वताचे घेण्यासाठी करौड रुपये लागतात मुंबईमध्ये .भाड्याने घर घेतौ व एकदाचा संसार चालू होतो  .तौपर्यंत बरेच वय निघून गेलेल असते व नंतरही ओढाताण चालूच असते
   शेवटी ते शिक्षण ही नको व नोकरीही .शिक्षकाचे हे हाल कुणालाच दिसत नाही म्हणून शिक्षणसेवक ते शिक्षक हा प्रवास नको रे बाबा कुणाच्या वाटेला .

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...