जीवन व मरण
कोणताही प्राणी जेव्हा जन्माला येतो तेव्हा ते सर्वांना आधीच कळलेले असते व त्याला काय काय लागणार जन्म झाल्यावर हे नियती आधीच त्याची तयारी करुन ठेवते.त्याला दुधाची व्यवस्था आधीच तयार झालेली असते .त्याचे स्वागत करण्यासाठी सर्वजण तयारीला लागतात.नऊ महिने आधीच त्याच्या जन्माची चाहूल नियती ही सर्वाना माहिती करते पण
मरण मात्र नियती कुणालाच कळू न देता आकस्मित उचलून नेते .सर्वाना गाफिल ठेवून मृत्यू मात्र हा घारीप्रमाणे झडप घालतो .सर्वाना बेसावध ठेवून असा काही शिरतो की सर्वांना चकित करून सोडतो. मगअस कसं झाल .हे घडायला नको होते या पलिकडे माणसाजवळ बोलायला काहीच नसते.चांगल्या माणसाला पण वाईट मृत्यू येतो व वाईट वागणार्या माणसाला काहीवेळा चांगला मृत्यू येतो हे कोडेच आहे.कधी येईल व कसा येईल याची तारिख वेळ आजपर्यंत कुणालाच सांगता आलेली नाही.मृत्यूला कोणत्याही वयाची अट नसते.काहीजण काहींच्या मृत्यूची वाट बघतात पण त्याचा होण्याआधीच स्वताचा झालेला असतो.चांगल्या माणसांना आयुष्य हे जास्त नसते हे बर्याच उदाहरणांवरून सांगता येईल. शिवाजी महाराज तुकोबा ज्ञानेश्वर शास्री सुभाषबाबू असे असंख्य सांगता येईल.
मला वाटते जन्माचे स्वागत नियती आधीपासून करते कारण तिला वाटतं असणार हा किंवा ही काहीतरी चांगल करून दाखवणार व जेव्हा तो चांगल करतो तेव्हा नियती म्हणते बसं झालं एवढंच तुझ्याकडून इच्छा होती व त्याला ऐन तारूण्यात नेते व जे चांगले करत नाही त्यांच्याबाबतीत ती काय करते ते समाजात बघून तुम्हीच ठरवा. असा आहे जन्म व मरणाचा खेळ.
प्रा. दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment