Skip to main content

आत बसलेला गुरू

आत बसलेला गुरू
बरेच जण गुरूच्या शोधात फिरतात काहींना भेटतो तर काहींना फसवणारे गुरू भेटतात मग गुरूवरचा विश्वास उडतो पण खरं सांगू का खरा गुरू तुमच्या आत बसलेला आहे योग्य वेळ आली की तो दिशा देत असतो पण आपल लक्षच नसते म्हणून आपण संकटात सापडतो .एखादी गोष्ट घडली आपल्या हातून तर ती चांगली घडली की वाईट हे आतूनच आपल्याला कळतं पण आपण आत डोकावलं तरच तो signal कळतो व आपणच शेवटी म्हणतो असे बोलायला नाही पाहिजे होते असे वागायला नको होते .वाईट वागलो तर आपणच आतून दु:खी होतो मन अस्वस्थ होते कशातच मन लागत नाही व आपल्या हातून चांगली गोष्ट घडली की आपण आनंदी होतो म्हणून सांगतो आपणच आपल्याला तपासावे काय चांगले व काय वाईट .आपले मनच आपल्याला जाणीव करून देते .काही वेळेस जर आतून कोणताच प्रतिसाद आला नाही तर शांत एका ठिकाणी बसावे व आत डोकावल्याने उत्तर सापडते.
       आपल्या डोक्यातच GpRS असते .हे gprs आपल्याला माहित असलेले ठिकाणाचा पत्ता फक्त सांगते कारण समजा आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे व ते ठिकाण आधीच माहित आहे तेव्हा आपल्या डोक्यात त्याचा मार्ग तयार होतो व तो मार्ग आठवून त्या map ने आपण त्या ठिकाणी पोहचतो. कुणाला काही बोलायचे असेल तेव्हा आपण आपल्या मनात लिहितो व मग वेळ आली की पटकन बोलून मोकळे होते.काहींचा आत लिहिण्याचा वेग फार असतो .आपल्याला भूक लागली तर आपल्यालाच जाणवते  दूसर्‍याला नाही.आनंद झाला किंवा दु:ख झाल तर आपल्यात बदल होतो व तो आपण पाहत असतो पण जर तटस्थ पणे बघायची कला जर शिकलो तर मात्र आनंद किंवा दु:खात आपण सम राहाणार .मन विचलित होणार नाही म्हणून निरीक्षक फक्त बनले पाहिजे त्याच्यात involve झालो की मग मात्र त्रास होतो मनाला .शेवटी जीवन जगणं म्हणजे कला.एका परिस्थितीत एक कोलमोडतो व दुसरा आनंदात असतो म्हणून सांगतो अशी कला शिकली पाहिजे.शरीरच आपल्याला वय झाल्याची जाणीव करून देते .म्हणजे आत डोकावण्याची कला आली की गुरू बाहेर शोधण्याची गरज नाही व शेवटी उत्तर मिळेल आपणच आपल्या जीवनाचा सांगाती.तुकाराम महाराज पण म्हणतात देव पाहावयासी गेलो तो देवच होऊन ठेलो .रात्री झोपायच्या आधी स्वताला तपासा तुम्हाला उत्तर मिळेल .बघा जमतं का

प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅंलेज मुंबई

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...