हसमुख व्यक्तिमत्व (कर्णिक सर)
सरांना देतो आम्ही निवृतीच्या शुभेच्छा।
परमेश्वर करील त्यांच्या पूर्ण इच्छा।।
सर म्हणजे एक हसमुख व्यक्ती।
काय जादू आहे सांगणार का ती युक्ती।।
वाचनालय आठवले की सर आठवतात।
अन सर आठवले की पुस्तके आठवतात।।
सरांनी बसवली वाचनालयाची घडी।
अचूक हेरली विद्यार्थी अन शिक्षकांची नाडी।।
वाचनालयातला निटनेटकेपणा भावतो।
ते पाहून सरांना सलाम करावासा वाटतो।।
सरांच्या आर्शिवादाने वाचनालय असेच छान राहील।
अन विद्यार्थी शिक्षक त्याचा लाभ घेतील।।
विनोद बुध्दीने जिंकतात सर्व मैफली।
सांगा ना कुणी ही कला शिकवली।।
सर्व विषयांचा अभ्यांस आहे तुमचा दांडगा।
त्यासाठी कोणता आहे तोडगा।।
भाषा शैलीने होतात लोक मंत्रमुग्ध।
जसे श्रावणातले बरसतात मेघ।।
आत्मविश्वास आहे भरपूर तुमच्यात।
हाच गुण यावा तुमच्याकडून आमच्यात।।
सर तुम्ही शांत आहात तोपर्यत आलबेल असतं।
एकदा चिडलात तर नाही कुणाला आवरतं।।
सर तुम्ही रूपारेलला अधून मधून येत जा।
अन तुमच्या ज्ञानाचा फायदा रूपारेलला करत जा।।
जरी नोकरीतून तुम्ही निवृत झालात।
तरी राहील स्थान कायम रूपारेलच्या मनात।।
सर आज पुस्तकेही रडतील फार।
कारण निवृत्त होतो त्यांचा भक्कम आधार।।
निरोगी आयुष्यासाठी करतो देवाकडे प्रार्थना।
हिच आहे आज आमची मनोकामना।।
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
7738601925
Comments
Post a Comment