मी कोण
मी कोण हा प्रश्न कधी स्वताला विचारला का? डोळे बंद करा व शांत मनाने स्वतालाच विचारा मी कोण व मीच का .उत्तर मिळणे कठिण आणि जर मिळालेच तर तो भाग्याचा दिवस समजावा.मी कुठून आलो कुठे जाणार व मी काय करतो व का करतो कुणासाठी व कशाला करतो ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली की समजा स्वताला ओळखले. दुसर्यालाओळखणे सोपे पण स्वताला ओळखणे फार अवघड.जे नाव आहे आपले ते तर शरीराचे नाव आहे .शरीर मिळाल्यावर नाव ठेवले गेले पण ते नाव म्हणजेच मी आहे का? नाही तर मग मी कोण .जन्माच्या आधी कुठे होतो .आईच्या पोटात अंधार कोठडीमध्ये नऊ महिने आपण बंदिस्त होतो सर्व हात पाय बांधून .आता विचार करा खरचं तोच मी होतो.मी कुणाचा नातेवाईक आहे का ?की सर्व माझ्या शरिराचे नातेवाईक आहेत .शरीर गेल्यावर सर्व संबंध संपणारचं ना .मग सर्व माझ्या शरीराचे नातेवाईक आहेत मग मी चे नातेवाईक कोण?मी म्हणजे कोण.स्वताला ओळखणे हेच तर जीवनाचे ध्येय असले पाहिजे .ज्यादिवशी हे होईल तो आपला खरा दिवस असेन.कारण भगवान म्हणतो सर्वामध्ये मी आहे.मग मी म्हणजे खरचं तो स्वता आहे का?मी म्हणजेच तो आहे का?मग मी म्हणजे तोच असेल तर मग तशी प्रचिती घेता येईल का?मी म्हणजेच तो आहे मग चिंता मिटल्या सर्व.मग मी लाच ओळखायचे राहून जाते.
जसे काय पंढरपूरला जायचं आहे .मग वाटेमध्ये दूसर्याच कशाला नादी लागलो व पंढरपूरला न जाताच परत आलो तसचं मी ला ओळखणे हे ध्येय आहे पण संसारात एवढे अपण रममाण होतो की खरे ध्येय विसरतो व त्याला ओळखणे राहूनच जाते व अशातच जीवन संपते व मी ओळखल्याचा काही आनंदच घेता येत नाही किंवा मी ला ओळखल्यावर आपली स्थिती कशी होते व हे जग कसे दिसू लागते व आपले विचार कसे बदलतात हा अनुभव घेण्याचा राहूनच जातो .म्हणून एकनाथ महाराज म्हणतात ओळखिला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिध्दीसहित.रोज रात्री डोळे बंद करुन शांत मनाने दृष्टी एकत्र करून संसारातल्या चिंता बाजूला करून बसावे व आत डोकावून प्रश्न विचारावा मी कोण .कदाचित काही दिवसांनी उत्तर मिळेल व त्यानंतर खरे जीवन सुरू होईल.बघूया प्रयत्न करुन जमतं का आपल्याला?
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
Comments
Post a Comment