आला रे आला पाऊस
पाऊस आला पाऊस आला
झाला आनंद आम्हा सर्वाना।
सर्विकडे पाणीच पाणीच
झाला जास्त आनंद शेतकर्यांना।।
भरले धरणे भरले तलावं
ओसंडून वाहू लागल्या नदी नाले।
गायीगूरांना झाला चारा
सर्वजण आनंदी झाले।।
शेतरान झाले हिरवे हिरवे
जसा पडला हिरवा सडा।
पशूपक्षी लागले कामाला
त्यांच्या कामात नको खोडा।।
संचारला उत्साह सर्वामध्ये
प्रत्येकाची चालली धावपळ।
कुणाजवळ नाही वेळ उरला
पावसाने केली सर्वाची पळापळ।।
पाऊस राजा अशीच कृपा राहू दे
भरू दे शेतकर्यांचे धनधान्याने घर।
येवू दे त्यांच्या घरी सुखसमृध्दी
आण त्यांची गाडी प्रगतीपथावर।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment