Skip to main content

आजचा अभिमन्यू

आजचा अभिमन्यू
पुराणात गोष्ट वाचली होती की अभिमन्यूने चक्र भेदले व अत घूसला व पराक्रम गाजवला पण बाहेर पडणे त्याला माहित नसल्याने त्यातच त्याचा अंत झाला .आजच्या तरूणाची अवस्था तशीच आहे .प्रत्येक क्षेत्रामध्ये तो जातो पण आत काहीच सापडत नाही व त्यातून बाहेर त्याला पडताच येत नाही .मुख्य म्हणजे कुठे जावं हेच कळत नाही.डाॅक्टर पेशाकडे जावं तर प्रचंड स्पर्धा .पैशांचा पाऊस असेल तरच डाॅक्टर होता येत नाहीतर स्पर्ध्येमध्ये अव्वल असले पाहिजे .समजा गरीब मुलाचा govt.मध्ये नंबर लागला .मग डिग्री मिळाल्यानंतर पुढे काय .दवाखाना टाकण्यासाठी पैसे एवढे कुठून आणणार .दवाखाना सेट होण्यासाठी किती वर्ष लागतात मग त्यातून बाहेर ही पडता येत नाही.दुसरीकडे इंजिनिअरिंग काॅलेज हजारोंनी झाले आहेत .दरवर्षी रिकाम्या जागा असतात .काॅलेज वाल्यांना काॅलेज चालवायचं असतं व काही मुलांना तेथे काही समजत नाही कशीतरी डिग्रि हातात घेतात व बाहेर पडतात पण नोकरी मिळत नाही पाच दहा हजारावर आठ तास काम करतात पण ते क्षेत्र सोडून बाहेर कसं पडायचं हेच माहीत नसतं.समजा रेग्यूलर प्लेन BSC  MA  COMपण पुढे काय  करायचं तेच समजत नाही mpsc upsc  द्यायची की पोस्ट ग्रॅज्यूएट करायच मग बीएड करायचंकी net set द्यायची काहीच कळत नाही .net set झाल तरी cast ची जागा असते .बीऐड केले तरी मग शिक्षकसेवक तीन वर्ष काढा पण त्यानंतरही तमाशे कायमस्वरूपी व्हायचे मग त्यातून बाहेर पडणे कळत नाही .एखादा व्यवसाय सूरू केला व यशस्वी नाही झाला मग त्यातून कसे बाहेर पडायचं काहीच कळत नाही.शिक्षण झाल्यावर नोकरी नाही मग शेती करायला लाज वाटते अशा मानसिक स्थितीतून कसे बाहेर पडायचे काहीच कळतं नाही.म्हणून आजच्या तरूणांना कुठे जावं हेच कळेनासे झाले .कुठले क्षेत्र निवडावे व कोणते चांगलं हेच कळेनासे झाले .कुठेही स्थैर्य दिसत नाही व तीस वयापर्यंत कायमस्वरूपी नोकरी होत नाही मग पुढचे सर्वच आयूष्याचं गणित चुकतं .बाप रिटायर होतो व मुले दहावी बारावी ला असतात मग पैसा कुठून आणणार ह्या परिस्थातून बाहेर कसं पडावं तेच कळतं नाही.काही तरूणांना छानशौकीत राहायला आवडतं महागड्या वस्तूशिवाय ते वापरत नाही अर्थातच बापाच्या जीवावर मग ह्या चैनीतून बाहेर कसं पडावंहेच त्यांना कळतं नाही.विचार करा की आपण खरंच अभिमन्यू झालो आहोत का?सर्व परिस्थितीतून बाहेर पडायला जमतं का बघा.

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...