मृत्यू एक आजार
प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या आजाराला सामोरे जावे लागते.काही आजार फार गंभीर असतात कॅंन्सर सारखे .त्या आजारात माणूस फार हळवा होतो सर्वांशी त्याला बोलावेसे वाटते .वाईट कुणाचं कराव असे वाटत नाही .सर्व शत्रूत्व विसरतो व चांगले वागण्याचा प्रयत्न करतो कारण त्यासमोर मृत्यू परतून गेलेला असतो .अचानक माणूस बदलतो .आजार माणसाला बदलवतो.पण ज्यांनी कधी आजारच बघितला नाही तोमात्र स्वताला घमेंडखोर मिरवतो व दाखवतो.सर्वांना तुच्छ लेखतो .नम्रपणा विसरतो माझ्यासारखा कुणीच नाही असे मानतो छोट्या गोष्टीवरून हमरुतूमरीवर येतो .कोणत्या नात्याशी ओळख ठेवत नाही कारण त्याच्या संसारात सर्व आलबेल असते .सुखांनी तर पायघड्या घातलेल्या असतात पण
तो मात्र विसरतो की प्रत्येकाला एक आजार जडलेला आहे व तो म्हणजे मृत्यू .सर्वांना येणारा असा आजार आहे कुणालाही तो चुकला नाहीआजपर्यंत पण माणूस मात्र ह्या आजाराला विसरला .कोणत्याही क्षणाला व कुणावरही झडप घालू शकतो .तो येणार म्हणून माणूस विचार करणार व स्वतामध्ये बदल करून घेणार ते शक्यचं नाही कारण तो येणार असे फक्त म्हणतात पण आपल्याला येणार हे कधीही शक्य नाही असेच माणूस भ्रमात राहतोव शेवट पर्यंत मी मी करत असतो व सर्वांशी प्रेमाने वागणे नम्रपणाने बोलणे आपूलकी विचारणे त्याला कमीपणा वाटतो आणि खडूसपणे सर्वांशी वागत असतो .त्याने विचार केला की आपले आयुष्य शंभर वर्ष आहे व पन्नास संपले आहे आता फक्त पन्नास उरलेत तर त्याचा जास्तीत जास्त चांगला वापर कसा करता येईल याचा विचार करून जीवन घालवले पाहिजे .ज्यांच्यासाठी हे सर्व करतो ते फक्त स्मशानापर्यंतच येणार व पुढे आपले कर्मच उपयोगी पडणार तरी पण माणूस सुधरायला तयार नाही .किती तरी वाईट गोष्टी तो दिवसभर करतो .चोर्यामार्या खोटे बोलणे शिवीगाळ मारझोड लुटालूट फसवणूक कामात चूका अशाकितीतरी गोष्ट करण्यात त्याला धन्यता वाटते कारण तो मृत्यूला विसरला आहे व तो एक दिवस नक्की येणार हे हीविसरतो म्हणून वाईट गोष्टी त्याच्या हातून होतात .माणूस फक्त बोलतो एक दिवस जायचे आहे पण कोरडेपणाने.खरंच मनापासून त्याला वाटतं असेल तर तो स्वता मध्ये बदल करून घेईन व सर्वांशी प्रेमाने व आदराने वागेन .म्हणून मृत्यूची जाणीव ठेवा व आहे त्या ठिकाणीतुम्ही सूखी होणार व वाटणार यात शंकाच नाही आणि सर्व मानव जात सुखी होईल .सर्व एकमेकांना मानाने वागवणार
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment