🌹🌹गुढी पाडवा🌹🌹
गुढी पाडवा सण आहे मोठा
नाही आनंदाला तोटा।
मराठी वर्षांचा आहे पहिला दिवस
करू या स्वागत पहिला मास।
चुकल माकलं सारे माफ करूं
नवीन जीवन पुन्हा करू सुरू।
उभारू आनंदाची नवीन वर्षाची गुढी
नका काढू आज जुन्या गोष्टीची पुडी।
पसरवू नका अफवा आजच्या दिवशी
मराठी वर्ष सुरू होते बनू नका आळशी।
गोड धोड करून साजरा करा पाडवा
आज तरी कुणाला नका पाडू आडवा।
ठेवा घरात आज आनंदी वातावरण
नका करू आज आनंदाचे मरण।
आॅफिसच्या कामाचे नको काही विचार
करू या कुटूंबात आनंद हजर।
नवा उत्साह नवे विचार नवा उमंग
नवी उमेद आणू ह्या सार्याचा खमंग।
देतो गुढी पाडव्याच्या लाख लाख शूभेच्छा
होतील सार्या पुर्ण तुमच्या इच्छा।
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment