तडजोड
तडजोड हा शब्द आहे चार अक्षरी पण जीवनाचे यश अपयश ह्या शब्दाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही .ज्याच्याजवळ हा शब्द नाही त्याला जीवनात अनेक संकटाना सामोरे जावे लागते .प्रत्येक ठिकाणी तडजोडशिवाय पर्याय नाही.संसारात जर तडजोड केली नाही तर एक दिवसही संसार टिकणार नाही. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्याच घडल्या पाहिजे असे कधीही शक्य होत नाही आणी जर शक्य होत असेल तर कुणाला तरी तूम्ही दु:खी ठेवून किंवा कुणाचे तरी मन मारून ते करत असतात .दूसर्यालाही आनंद वाटेल अशा गोष्टी आपण केल्या पाहिजे म्हणजेच तडजोड आपल्या मनाची .तडजोडीतून आनंद प्राप्त होतो .तडजोड ही माणसाने शिकली पाहिजे.कामाच्या ठिकाणी बर्याच गोष्टी आपल्या मनाविरूध्द होतात पण लगेच आपण आपल्या मनासारखे न करता तडजोड करून मार्ग काढावा नाहीतर उगीच आपण टिकेचे धनी होतो तडजोड म्हणजे हार मानने मूळिच नाही .कुठेतरी दूसर्याला बरं वाटावेयासाठी बाकी काही नाही.
तडजोड नसल्यामूळे बर्याच लोकांचे संसार काडीमोड झालेत .नात्यांमध्ये दरी निर्माण झाल्या .वरिष्ठाविषयी द्वेषाची भावना तयार झाली .अनेक लोक तुरूंगात पडलेत कारण तडजोड नसल्यामूळे दूसर्यावर हूकूमत गाजवत असताना त्यांच्याकडून अपराध झालेत.म्हणून थोडं पाऊल मागे घेतल्याने काही बिघडत नाही पण समोरचा व्यक्ती बघून.आपल्या तडजोडीमूळे जर गैरफायदा तो घेत असेल तर मात्र तडजोड करूचं नये .सारासार विचार करून लवचिकता दाखवावी .काही वेळेस आपले नियम बाजूला ठेवून निर्णय घ्यावेत.बघा जमतं का
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅंलेज मुंबई
Comments
Post a Comment