Skip to main content

खुर्चीचा वापर

खुर्चीचा वापर

काही जणांना नशिबाने खुर्ची मिळते तर काहींना खूप कष्ट करून मिळते पण त्या खुर्चीचा वापर कसा करतात ते आपल्याला  समाजात बघायला मिळते.काही तर असे वागतात की आपल्या समोर बसलेला म्हणजे बावळट व आपण खुर्चीवर बसलेला म्हणजे फार शहाणा .काहीकडे एवढी पण माणूसकी नसते की या बसा म्हणायची .त्यांच्यासमोर उभे राहिल्याने त्यांना आपण ग्रेट असल्यासारखे वाटते.खुर्चीवर बसल्यावर त्यांच्यात अभिमान जागा होतो मग्रूरी अंगात शिरते दुसर्‍याला कमीपणा द्यायला शिकतात.जेवढे वाईट गुण असतात तेवढे शिरतात .दुसर्‍याचा अपमान करण्यासाठीच आपल्याला खुर्ची मिळाली आहे असे त्यांना वाटते .सरळ बोलणे म्हणजे कमीपणा असेच त्यांना वाटते.दुसर्‍याची प्रशंसा करणे त्यांना जमतचं नाही.अपमान करण्याची ते संधी शोधत असतात .स्वताला ज्ञानी समजायला लागतात.त्यांच्यामूळे सर्व जण परेशान असतात व प्रत्येकजण त्यांचे कधीच चांगले चिंतन करत नाही .थोडं काम असेल तर बर्‍याच चकरा माराव्या लागतात .सहजासहजी कामे होत नाहीत .मुद्दाम लोकांना ताटकळत ठेवतात .फोनवर आपल्यासमोर बराच वेळ गप्पा मारत असतात पण आपल्याशी बोलायला वेळ नसतो व कामे करायलाही .काम केलं म्हणजे फार मोठा उपकार केला असं भासवतात .कामाच्या मोबदल्यात लाच मागतात .त्यांना काहीच लाज वाटत नाही .सारी लाज त्यांनी खुंटीला टांगून ठेवलेली असते असा खुर्चीचा गैरफायदा काहीजण करतात
   पण काही मात्र आपल्याला खुर्ची मिळाली ती लोकांची सेवा करण्यासाठीचअसे त्यांना वाटते व त्याप्रमाणे ते लोकांना मदत करतात लोकांच्या फायद्यासाठी झटतात .लोकही त्यांना डोक्यावर घेतात .आर्शिवाद ही लोकं भरभरून त्यांना देतात .अशा लोकांमूळेच समाजाची व देशाची प्रगती होत असते खुर्चिचा पूरेपूर उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करतात अशा लोकांना सलामच केलाअसेच लोक खुर्चीला लायक आहेत व खुर्चीचा मान अशा लोकांमूळेच वाढतो आणि अशा लोकांबद्दल आदर ते गेल्यावर सूध्दा लोक काढतात.
   म्हणून सांगतो खुर्ची मिळाली किंवा मिळवली असेल तर लोक कल्याणासाठी तिचा वापर करा नाहीतर retired झाल्यावर किंवा मेल्यावर लोक तुमच्या नावावर थुंकतील व चांगला लोकांसाठी वापर केला तर देवा इतकेच तुम्हाला मानतील किंबहूना देवच मानतील व आपल्या ह्यदयात तुम्हाला जागा देतील.बघा विचार करा तुम्ही खूर्चीचा वापर कसा करता

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...