आतील सिग्नल
बर्याच लोकांना ही गंमत वाटेल व काही हसतील सुध्दा की आतील सिग्नल हे काहीही नसते पण तो असतो व तो येत असतो त्यावर बारकाईने लक्ष दिले तर आपल्याला त्याची जाणीव होते कारण ज्यावेळेस आपल्याबद्दल एखादी वाईट गोष्ट घडणार असते तेव्हा आतून आपल्याला सिग्नल येत असतो व तो आपल्याला सावध करतो पण आपले त्याकडे लक्षचं नसते व घटना घडून गेल्यावर आपल्याला वाटते की ते मला आधी जाणवलं होते पण मी ऐकले नाही .म्हणून एखादी गोष्ट जेव्हा वाईट घडणार असते तेव्हा आतील सिग्नल कडे जरा बारकाईने लक्ष द्या व त्याचे ऐका त्यामुळे पुढचा अनर्थ टळेल व एका मोठ्या संकटातून तुम्ही वाचणार .तो सिग्नल हाआतून कुठूनतरी येत असतो व तो आपल्याला एका संकटातून वाचवण्यासाठी येत असतो पण आपलं दुर्दव्य असं की आपला विश्वास नसल्याने तो आपल्याला ऐकू येत नाही जरी आला तरी आपण लक्ष देत नाही .मला तर बर्याच वेळेला तसा अनूभव आला .बर्याच जणांना आला असेल .ज्यांना आला नसेल त्यांनी बारीक लक्ष देवून ऐकायचा प्रयत्न करा. काहीजण त्याला आत्माचा आवाज म्हणतात तर काहीजण आतील आवाज म्हणतात म्हणजे आपल्याला संकटातून वाचवण्यासाठी आपला मित्र आपल्याच जवळ असतो व तो सतत आपल्याला जागृत करत असतो पण आपल्याला त्याची किंमत नसते म्हणतात ना काखेत कोळसा अन गावाला वळसा तर मग तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू या
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
Comments
Post a Comment