आठवणीतले माणसं
माणसाला जीवनात पदोपदी अनेक माणसं भेटतात पण त्यातले किती जण आठवतात अगदी मोजकेच .काही तर मनातून एवढे पुसले जातात की त्यांना आपण कधी भेटलो हे ही लक्षात येत नाही पण काहींना विसरणे फार अवघड त्यांच्या बरोबर घालवलेले क्षण प्रखरपणे आठवतात व डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहतात.काही बरोबर एवढा वाईट अनूभव आलेला असतो की ती आठवण काढणे ही नकोच वाटते व त्यांचा चेहरा ही बघावसा वाटत नाही .चांगल्या माणसांबरोबर घालवलेले दिवस आठवले की वाटतं त्याची परत भेट व्हावी त्यासाठी फेसबूक वाॅटसअप यांचा आधार घेवून आपण शोधमोहिम चालू करतो पण यश येत नाही मग काही दिवसांनी त्याचा सूगावा लागतो तेव्हा किती आनंद होतो व मागील सर्व कनेक्शन जोडले जाते मग पुन्हा सूरू होतो गप्पाचा प्रवास .मरगळ आलेली निघून गेलेली असतेव नवीन जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळते .बर्याच वेळा माणसाचे जीवन एका व्यक्तीभोवती फिरत असते मग ती बायको असेल किंवा आईवडिल असतील भाऊबहिण असतील मूले असतील किंवा मित्र मैत्रिणी असतील .त्यांना काही झाले तर याचा काळजाचा ठोका चुकतो .ते आनंदी राहावेत म्हणून जीवाचा आटापिटा चाललेला असतो .जगात एवढी माणसं आहेत पण त्याच्या दृष्टीने आहेत काय आणि नाहीत काय कारण ते कसेही वागले तर त्याला काहीच फरक पडत नाही पण ज्याच्या भोवती त्याचे आयूष्य रेंगाळत असते त्याला काही झालं तर मात्र तो कोलमोडून पडतो किंवा त्याच्याकडून वाईट वागणूक मिळाली तर हताश होतो जीवन त्याला निरस वाटायला लागते .कोणताही उत्साह त्याला वाटतं नाही .जगावंस वाटत नाही आणि ती व्यक्ती परत चांगली झाली तर मग त्याचा उत्साह ओसंडून वाहू लागतो .असाच अनूभव प्रत्येकाला जीवनात येत असतो पण ज्या व्यक्तीभोवती सारं जीवन फिरत असते तेव्हा संयम ती असतांना तिच्याशिवाय जगण्याची कला माणसाला यायला पाहिजे ते फार अवघड आहे त्या रामाला व सितेलाही जमलं नाही .नाही जमलं तर मात्र त्या व्यक्ती शिवाय जीवन नसल्यासारखंच होईल ती व्यक्ती दिसली नाहीतर तो बेचैन होतो कारण सर्व त्याला त्या व्यक्तीशिवाय कुणाशीच बोलायचं नसते त्या व्यक्तीने हिरवा कदील दिला तर मग कोणताही विचार न करता निर्णय घेवून मोकळा होतो सकाळ पासून रात्रीपर्यंत जी उर्जा त्याला मिळते ती त्या व्यक्तीमूळेच मग आपल्या आवडी निवडी बाजूला ठेवून तो तिच्या आवडी निवडीचा विचार करतो असंच असतं माणसाच जीवन वाट बघणारं कुणीतरी जवळचं हव माणसाला.किंवा आपण कुणाचीतरी वाट बघणारं बनाव म्हणजे जीवन निरस होत नाही मग ती व्यक्ती दूर राहून सुध्दा तसं जगता येतं बघा जमत का
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment