सृष्टी निर्माता
विचार करा जेव्हा पृथ्वी निर्माण झाली तेव्हा त्याने किती विचार पूर्वक सर्व गोष्टी केल्या .सूर्य पृथ्वीच्या अजून थोडा जरी जवळ राहिला असता तरी पृथ्वी नष्ट झाली असती .योग्य अंतरावर ठेवून तिची काळजी घेतली .कुणी म्हणेल हे आपोआप घडलं .आपल्या तोंडात घास सुध्दा आपोआप जात नाही.मग पृथ्वीवर अनेक वनस्पती निर्माण केल्यात .मग माणूस का बियाणे घेवून सर्विकडे पेरायला गेला होता का ?मग मानव जात कशी जन्माला आली हे सांगणे अवघडचं.मानव जात म्हणजे एक पुरूष व स्री असली पाहिजे मग त्यांचाच जन्म कसा झाला हे सांगणारे अनेक कथा आहेत.माणसाची जसजशी संख्या वाढत गेली तसतसे माणूस भेदाभेद करायला लागला मग हा काय काळा आहे हा काय गोरा आहे.मग काळे एकत्र राहायला लागले व गोरे एकत्र राहायला लागले.मग त्यांच्यात भांडणे व्हायला लागलि.मग हळूहळू व्यवसाय गरजेपोटी निर्माण झालेत .मग एक व्यवसाय करणार्यांचा एक गट निर्माण झाला .अशा पध्दतीने अनेक गट निर्माण झालेत .माणसापेक्षा तो कोणत्या गटात आहे त्याला महत्व प्राप्त झालं.त्या गटाला नाव चिटकवली म्हणजे जाती तयार झाल्या .दिसतात मानव जात पण जातीने धर्माने त्यांच्यांत भिंती उभ्या केल्या व एकमेकांवरच हल्ला करू लागले.हे सर्व बघून विधात्याला फार दु:ख होत असेल .कुणीही हे थांबवू शकणार नाही.एखाद्या जून्या घराला कितीही दूरूस्ती केली तरी नव्याची सर नाही येत त्याला मग काहीजण ते तोडतात व नवीन विचाराने अत्याधूनिक पध्दतीने बांधतात त्याचप्रमाणे ह्या जगाला सूंदर बनवायचे असेल तर एक दिवस तोही असंच करेल.एखादा ग्रह पृथ्वीला असा काय धडकणार की पूर्ण पृथ्वी नष्ट होणार व सर्व जीवसृष्टी .मग त्याला हवी असलेली सूंदर पृथ्वी तयार करणार व पुन्हा अशी मानव जात राहणार .
की तेथे एकच जात फक्त मानव.कुणी कुणाचा द्वेष करणार नाही .त्यांचा एकच परमेश्वर असणार.सर्व गुण्यागोविंदाने राहणार.कुणी कुणावर हल्ले करणार नाही .वातावरण स्वच्छ .आजाराला थारा नसेल .भ्रष्टाचार नसेल.आणि म्हणून माणसाचं आयूर्मान 1000 वर्ष असेल.हे सर्व बघून विधाता खूश होणार .मग वेळेवर पाऊस .कुठे प्रलय नाही भुकंप नसणार.सर्व आनंदीआनंद असणार.. खून मारामार्या दरोडे बलात्कार असले प्रकार नसणार पोलीस न्यायालये नसणार .असणार फक्त माणूसकी . शिव्याशाप नसणार .एकमेकांना बघून आनंद वाटणार .प्राणिव पक्षी यांनाही माणसाबद्दल भीती नसणार .छान वाटत अशी कल्पना बघूया तो कधी मनावर घेतो सत्यांत येण्यासाठी.
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment