अदृश्य कनेक्शन
एकदा स्वामी विवेकानंद बोटीने प्रवास करत होते तेव्हा त्यांना आवाज आला की खाली उतर मग बोटीतून ते लगेच उतरले पण त्यांना कळले नाही की त्यांच्या गुरूने त्यांना असा आवाज का दिला .थोड्या वेळाने वादळात ती बोट बुडाली व सर्वजण बुडून मेलेत हे ऐकून त्यांना फार वाईट वाटले व रागही आला कारण ते रामकृष्णपरमहंसाचे शिष्य होते व त्यांनाच त्यांनी आवाज दिला बाकी त्यांचे शिष्य नव्हते म्हणून त्यांनी त्यांना आवाज दिला नाही मग गुरू हे स्वार्थी आहेत असे त्यांना वाटले व त्यांनी गुरूंना याबाबतीत विचारले.गुरू म्हणाले नरेद्र अस नाही जे तू समजतोच .मी सर्वांना सारखाच आवाज दिला पण तुझ्या आतील पावित्र्यामूळे तो आवाज फक्त तुला ऐकू आला बाकीच्यांना नाही .तू आतून एकदम शुध्द आहेस कोणतेही विकार नाहीत म्हणून तुझंव माझं कनेक्शन जोडले आहे त्यामुळे मी कायम तुझ्याबरोबरच असतो व तुला जे सावध करतो ते तुझ्यापर्यंत पोहचते व कठिण प्रसंगी तू मार्ग काढतो वास्तविक मीच त्या सूचना करत असतो
म्हणून आपले मित्रमंडळी नातेवाईक कुटूंबातील सदस्य आपल्या बरोबर कायम असतील असे नाही पण आत जो बसलेला आहे प्रत्येकात तो प्रत्येकाच्या एकदम जवळ आहे .त्याबाबतीत म्हणता येईल जेथे जातो तेथे तू माझा सांगाती .पण आपले लक्ष बाहेर .आत आपण कधीच डोकावत नाही .एकाने विचारलं परमेश्वराला की तू कोठे आहेस त्याने उत्तर दिले मी विश्वाच्या कुठेही कानाकोपर्यात असलो तरी माणूस शोधून काढणार पण एक ठिकाण अस आहे की त्या ठिकाणी तो कधीही शौधणार नाही ते ठिकाण म्हणजे माणसाचे ह्रदय .तेथे बसला आहे पण आतून ज्याचे अंतकरण शुध्द आहे त्यालाच तो दिसणार व प्रत्येकवेळी तो दिशा देत असतो अर्जूनाच्या रथावर बसून जसा त्याला दिशा देत होता तसंच तो आपल्यालाही देत असतो .पण शुध्द कनेक्शन नसल्याने त्याच्या सूचना आपल्याला ऐकू येत नाहीत .सर्व संकटातून तो धावत येतो पण कनेक्शन नसल्याने आपल्याला तो लाभ घेता येत नाही . आपल्या डोक्यात नूसता कचरा भरलेला असतो हा काय बोलला हा काय अस वागला मग मीही बोलेन दाखवून देईन बदला घेईन पाहून घेईल धडा शिकविन त्याला सोडणार नाही त्याला माफ करणार नाहीत्याच्याशी बोलणार नाही भर लोकात त्याची इज्जत काढीन त्याला बरबाद करीन असा सर्व कचरा भरलेला असल्याने आपले व आत जो बसला आहे त्याचे कनेक्शन तुटले आहे म्हणून आपल्यापर्यंत त्याच्या सूचना पोहोचत नाहीत व आपल्याला दु:ख प्राप्त होते .सागर कितना पास है फिर भी जीवन मे प्यास है अशी अवस्था आपली होते .तो शक्तीशाली आपल्या आत बसलेला असताना आपल्याला काळजी करायचे काय काम पण आपला विश्वास नाही ह्या गोष्टीवर त्यामूळे त्याच्याशी कनेक्शन जोडले गेले नाही .म्हणून आपणच आपले मित्र व आपणच आपले शत्रु आहोत .पटलं तर शुध्द होण्याचा प्रयत्न करू व मला खात्री आहे की त्यानंतर त्याचा अनूभव प्रत्येकाला आल्याशिवाय राहाणार नाही व तुकोबा सारखी अवस्था होईल देव पाहावयासी गेलो तो देवचं होऊन ठेलो .बघूया व शोधू आपला खरा मित्र आपल्या आत व घेवू या त्या परम शांतीचा अनूभव मग बघा कसं जीवन बदलेल व दृष्टीही जगाकडे बघण्याची
प्रा. दगा देवरे
7738601925
Comments
Post a Comment