Skip to main content

धरती व पाऊस

धरतीव पाऊस
धरती व पावसाचे अतुट असे नाते आहे ते एकमेकांशिवाय राहूच शकत नाही.हिवाळा व ऊन्हाळा गेल्यावर धरतीला पावसाची अत्यंत आठवण येत असते त्याच्या भेटीसाठी ती आतूर झालेली असते त्याच्याविना तिचे तेज कोमेजून गेलेले असते एखाद्या विधवा बाईसारखी तिची स्थिती झालेली असते .तिचे रूप मलून झालेले असते तिचा उत्साह गायब झालेला असतो ती पावसाची आतूरतेने वाट पाहत असते पावसाशिवाय तिचे जगणे व्यर्थ असते .तो जवळ नसल्याने तिच्यावरचे नदी नाले तळे विहीरी आटून गेलेल्या असतात जनावरांना खायला चारा उरलेला नसतो व पिण्यासाठी पाणी नसते पाण्याविना ते कासाविस झालेले असतात पशूपक्षी पाण्यामुळे हतबल झालेले असतात झाडे सूकून गेलेले असतात .डोंगरावर वाळवंट झालेले दिसते.शेती भकास  दिसते कुठेही हिरवेपणा दिसत नाही. सर्वांच्या चेहर्‍यावर निस्तेजपणा दिसतो .पाण्यासाठी लोकांना वनवन भटकावे लागते .हे सर्व बघून धरतीला फार वाईट वाटते तिचे अलंकार गळून पडलेले असतात ती पावसाकडे डोळे लावून बसते .तो तिचा प्रियकर तसेच मालक  प्राणसखा किंवा पतीपरमेश्वर असतो .त्याच्याशिवाय जगणे जगणे नसते .ही अवस्था बघून पावसालाही फार वाईट वाटते मग धरतीला भेटण्यासाठी तो ही आतूर होतो त्यासाठी तो तयारी करतो चार महिने धरतीवर राहण्यासाठी सर्व तयारीनिशी तो अवतरतो .तो येण्याची चाहूल धरतीला आधीच लागलेली असते .वातावरण शांत झालेली असते थोडा गारवा जाणवत असतो त्याच्या स्वागतासाठी गार हवा वाहत असते सूर्यही थोडा थंड झालेला असतो
   आणि मग आकाशात ढगांची जमवाजमव सूरू होते व त्याच्यावर आरूढ होऊन पाऊस धरतीला भेटण्यासाठी आतूर होतो कडकड आवाज करून धरतीवर बरसतो .धरतीला ओलेचिंब करतो .धरतीला तृप्त करण्यासाठी फार कोसळतो .नदी नाले सागर तळे तुडूंब भरून वाहू लागतात .धरती तृप्त होते एखाद्या नववधूसारखी .हिरवागार शालू नेसलेली वाटते .पावसाचे व तिचे मिलन होते एकमेकांना घट्ट मिठी मारतात .सजलेली नवरी सारखी दिसू लागते .चेहर्‍यावर तिचा उत्साह ओसंडून वाहू लागतो .स्वत:चे भान हरवून बसते पशूपक्षिही आनंदात भरार्‍या मारतात .तेही घरटे बांधायला सूरू करतात .शेतकरीही शेतात पेरणी करून शेतीही हिरवीगार दिसू लागते.पिण्यासाठी मूबलक पाणी सर्वांना मिळते .सर्विकडे आनंदीआनंद होतो .लहान मूलेही पावसात नाचतात .हे बघून पाऊस व धरती आनंदीत होतात व त्या आनंदात ते एकमेकांच्या कुशीत विसावतात .धन्य तो पाऊस व धन्य त्याची सखी धरती.

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...