कर्जमाफी
आजघडीला शेतकर्यांना कर्जमाफी द्यावी किंवा नाही याचाच उहापोह चालू आहे .मला वाटतं कर्जमाफी हा मूळ रोगावर तात्पूरता मलम आहे कारण काही वर्षांनी पुन्हा परत तिच शेतकर्यांची अवस्था होणार .शेतकर्यासाठी कायम स्वरूपी योजना सरकारने आखली पाहिजे .आमच्या बळिराजाला भिक नको पण मेहनतीचा पैसा पाहिजे आहे .जे काही शेतात पिकवलं त्याचा पूर्ण मोबदला मिळाला पाहिजे .सर्व पिकांना हमी भाव मिळाला पाहिजे .राजकारणी शेतकर्यांची ही मागणीसाठी का अडून बसत नाही .मतांसाठी त्यांना शेतकरी हवा असतो .अरे भिक नको हक्काचा पैसा द्या .सर्व शेतीमालाला हमी भाव मिळाल्यास शेतकरी नियोजन करून पिके घेतील आज काहीही पिकवल तर त्यातून पैसे येतीलच अस काहीच गॅंरंटी राहिली नाही .शेतकर्यांसाठी खरंच करायचे असेल तर खतांमध्ये 90% सबसिडी द्या मोफत बियाणे उपलब्ध करून द्या .शेतीचे अवजारांचे मोफत वाटप करा .शेळ्या मेंढ्या गाई म्हशी यांचे वाटप करा .दूय्यम धंद्यासाठी अल्प व्याजाने कर्ज उपलब्द करून द्या .करायचे तर सरकार शेतकर्यासाठी फार काही करू शकते पण शेतकर्यासाठी फक्त देखावा करायचा असतो .शेतकर्यासाठी कायम स्वरूपी योजना राबवा एवढंच म्हणायचे मला
बर्याच वेळा पाच पाच तास वीज नसते तेव्हा चोवीस तास वीज उपलब्द करून द्या व वीज बिलामध्ये सबसिडी द्या एखादे वेळेस डीपी बिघडली तर पंधरा दिवस मोटारी बंद असतात अधिकार्यांचे लक्ष नसते वायरमन आठ आठ दिवस फिरकत नाही तेव्हा हातात आलेले पिक नष्ट होते .शेतकर्यांना हजार हजार रूपये काढून ती डीपी आणावी लागते या सर्व प्रश्नाकडे बारकाइने लक्ष दिल्यास शेतकरु सुखी होईल .पिके येतात पण मजूर मिळत नाही त्यासाठी काही उपाययोजना आहेत का याचा विचार केला पाहिजे .विजेच्या लपंडाव मुळे शेतकर्यांच्या मोटारी जळतात त्या दुरू स्त करण्यासाठी दोन तीन हजार खर्च येतो त्यासाठी सरकार मोफत मोटारी दूरूस्त करून देण्यासाठी काही करेल का अशा भरपूर गोष्टींना शेतकर्यांना तोंड द्यावे लागते .मिपण शेतकरी होतो व आजही गावाला गेल्यावर ती कामे करतो व असे अनूभव स्वता घेतले आहेत ह्या सर्व प्रश्नातून जेव्हा शेतकरी सुटेल तरच सुखी होईल .शेतकर्यांच्या मुलांना नोकरीसाठी आरक्षण द्यावे शिक्षण मोफत द्यावे .मोठमोठ्या fees मध्ये सवलत द्यावी .हे सर्व प्रश्न लावून धरले पाहिजे खरे प्रश्न वेगळे आहेत नूसतं कर्जमाफी देवून काही उपयोग होणार नाही .जे खरे राजकारणी शेतकरी आहेत त्यांनाच असे अनुभव असणार बाकी फक्त शेतकर्यांसाठी काहीतरी करतो आहे याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतांना दिसतात.
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment