आहे त्याची किंमत करा
आपल्या जवळ जे आहे त्याची माणसाला कधीच किंमत नसते.ती गोष्ट निघून गेल्यावर त्याची किंमत समजायला लागते.आपल्या शरीरावर कधी प्रेम करता का .ते निरोगी राखण्यासाठी कोणता त्याग करतात .ते पवित्र स्वच्छ राहण्यासाठी काय काय करता.बरेच आळशी लोक दोन दोन दिवस आंघोळ करत नाही .जरी केली तरी पाच मिनिटात आंघोळ उरकतात तसेच न धुतलेले कपडे घालतात .उठल्या ऊठल्या तोंडात तंबाखू चुना कोंबतात .काही काही सकाळी सकाळी दारू ढोसतात म्हणजे शरीराला पवित्र करण्यापेक्षा त्याला घाण कसे केले जाईल याची काळजी घेता तसेच सकाळी काहींचा तोंडाचा पट्टा चालू होतो याला शिव्या दे त्याला शिव्या असा काहिंचा धंदा चालू होतो.मग शरीराला जर हेच पुरवत राहिलात किंवा पेरत राहिलात तर त्यातून चांगले उगवणार का ?जे तुम्ही त्याला देणार तेच परत मिळणार मग शरीराला मनाला अनेक व्याधीनी जखडले जाते .शरीर हे रोगाचे माहेर घर होते.नंतर माणसाला त्याची किंमत कळते पण वेळ निघून गेलेली असते,
तसेच घरातल्या माणसांना आपण assume करून चालतो .कधी प्रेमाचा शब्द तोंडातून निघत नाही कधी गप्पा नसतात कधी त्यांनी मागितले तर त्याकडे लक्ष देत नाहीत पण ते निघून गेल्यावर त्यांची कमतरता जाणवू लागते त्यांची किंमत कळायला लागते तसेच मित्रमंडळींच्या बाबतीत आहेत तोपर्यंत कदर नसते पण ते जीवनातून निघून गेल्यावर त्यांचे महत्व कळायला लागते म्हणून सांगतो आहे त्याची किंमत करा जोपर्यंत नोकरी किंवा धंदा होता तोपर्यंत त्याची कदर केली नाही प्रामाणिकपणे काम केले नाही आता कंपनी बंद पडली किंवा काही कारणाने तिच्यावर गंडातर आले तर मग किंमत कळायला लागते. तसेच जवळ पैसा असल्यावर याला दे त्याला दे इकडे उडव तिकडे उडव मग पैसा संपल्यावर किंवा त्याचे येण्याचे मार्ग बंद पडल्यावर त्याची फार किंमत जाणवायला लागते त्यामुळे आज जे तुमच्याजवळ आहे त्याची किंमत करा त्यावर प्रेम करा कारण ते निघून गेल्यावर तुम्हाला पश्चाताप वाटणार नाही बघा जमतं का
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
Comments
Post a Comment