हिरवा शालू
पाऊस आला अन सृष्टीने नेसला हिरवा शालू।
म्हणून दिसू लागलेत जिकडे तिकडे भालू।।
जशी काय ओढली हिरवी चादर।
करते सर्वांचा मनापासून आदर।।
पक्ष्यांचा सुरू झाला किलबिलाट।
अन मांडायला लागलेत संसाराचा थाट।।
शेतकरी झालेत पावसामुळे आनंदीआनंद।
अंथरला शेतावरती हिरवा कागद।।
प्राण्यांनाही मिळू लागला हिरवा चारा।
ते पाहून शेतकर्यांचा थंड झाला पारा।।
धबधब्यां खाली लोक होऊ लागलेत चिंब।
मुलांची सुरू झाली बोंबाबोंब।।
जसे काय जमलेत नववधुच्या स्वागतासाठी।
कारण तिने आनंद आणला सर्वांसाठी।।
हिरवा शालू नेसवतो पाऊस दरवर्षी।
म्हणून तोच आहे सर्वाचा महतत्श्रुषी।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment