निकाल
उद्या आहे बारावीचा निकाल।
लागेल विद्यार्थ्यांचा भविष्याचा कल।।
कुणी होईल आनंदी तर कुणी दु:खी।
आज सर्वांची गत एकसारखी।।
वाटतील बरेच जण पेढे।
निकाल बघून काही होतील वेडे।।
काही जण उद्याचे डाॅंक्टर।
तर काही जण इंजिनिअर।।
कुणी होतील शिक्षक ।
तर कुणी होतील प्रशासक।।
काहींच्या आईबाबांची मान होईल ताट।
अन पुरवतील त्यांनी सांगितलेली अट।।
निकाल बघून जातील पार्टीला।
अन फोन करून सांगतील नातेवाईकाला।।
जरी झाले अयशस्वी कुणी।
नका समजू स्वताला अवगुणी।।
अपयश ही असते यशाची पायरी।
अपयशाला नका समजू वारी।।
निकाल लागू दे सर्वांचा छान।
वाटू दे आईबाबांना मुलांचा अभिमान।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment