Skip to main content

कुटूंब

🌹🌹कुटूंब🌹🌹

माणसाच्या जीवनात कुटूंब हे फार महत्वाचे असते .माणूस जी जी प्रगती करतो ती कुटूंबाच्या जीवावर.कुटूंब म्हणजे आपली माणसे मग काहिंच्या जीवनात फार माणसे असतील तर काहींचं  कुटूंब limited असेल .जे ही काही असेल त्याचा पाठिंबा असल्याशिवाय तो पुढे जाऊच शकत नाही .कुटूंब म्हणजे त्याची ताकद असते .दु:ख आले तर सावरणारे कुणीतरी पाहिजे आणि सुख आले तर पाठीवर शाबासकीची थाप देणारे कुणीतरी पाहिजे तरच माणसाला समाधान लाभते .कुणीतरी वाट बघणारे हवे .कुणालातरी आपली गरज वाटली पाहिजे व आपल्यालाही कुणाची तरी गरज पाहिजे. कुणाच्या खांद्यावर डोके ठेवून रडता आले पाहिजे .हातात हात घेवून गूजगोष्टी सांगता आल्या पाहिजेअसे हक्काचे माणसे असले पाहिजे.कुणावर तरी हक्काने ओरडता आले पाहिजे व कुणीतरी आपल्यावर हक्काने ओरडले पाहिजे.कुणीतरी आपला राग घालवायला व समजूत काढणारे  असले पाहिजे .आपले डोळे पुसून मी आहे असे सांगणारे असले पाहिजे.संकटावेळी अवेळी धावून येणारे माणसे हवीत व आपणही स्व:ता धावून जायला पाहिजे तरच जीवनाला अर्थ राहणार नाहितर जीवन म्हणजे दिवस ढकलणे होय. बर्‍याच लोकांच्या तोंडून ऐकतो की काय करायचे दिवस ढकलतो आहे.हे वाक्य ऐकून मला तर फार राग येतो
         जर तुमचे कुणी आपले नाही तर देवाशी बोला त्याला सांगा त्याला आपले कुटूंब माना मग सर्वांमध्ये तो तुम्हाला दिसायला लागून व सर्व जग कुटूंब भासेल आणि त्यासाठी तुम्ही काहीतरी करणार .ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विश्वची माझे घर.विश्वालाच त्यांनी कुटूंब मानले होते पण आपण आपल्या कुटुंबालाच आपले मानले तर फार मोठी गोष्ट असेल.कुटूंबाची प्रगती झाली तर समाजाची व पर्यायाने देशाची होईल.कुटूंब हा माणसाचा कणा असतो म्हणून त्याला जपावे त्याचे सर्व अपराध पोटाता घालावे क्षमा करावी .माफी मागावी .दया द्यावी व घ्यावी.त्यांची काळजी घ्यावी .त्यांना गृहित धरू नये .गैरसमज दूर करावेत.त्यांना वेळ द्यावा.कधीतरी भेटवस्तू  देवून सरप्राईज करावे.अशा सर्व गोष्टीमूळे तूमचे जीवन रूचकर व आनंदाने भरून जाणार यात कोणतीही शंका नाही.प्रत्येकाची कुटूंबाची व्याख्या वेगवेगळी असते.unmarried असूनही  त्याचे कुटुंब वेगवेगळ्या स्वरूपात असते .कुटूंब हे एक आधार असते  भीतीला दूर ठेवण्याचे सामर्थ त्यात असते.ज्याचे कुटुंब उध्वस्त त्याचे जीवन निरस .मग तो फक्त दिवस ढकलतो .दिवस ढकलणे की आनंदात घालवणे हे प्रत्येकाच्या हातात असते .हे ज्याने त्याने ठरवायचे असते.आपली कुणाला गरज नसणे याशिवाय वाईट कोणतीच गोष्ट नाही.आपण कुणाचे ओझे होता कामा नये कुटूंबातच आपल्याला दूर लोटणारे नको .आपण त्याचा अविभाज्य भाग असला पाहिजे .हा कधी जाईल व माझी सुटका कधी होईल असे बरेच वेळा काही कुटूंबात ऐकायला मिळते.माझे नशिबच फुटकंअसेही ऐकायला मिळते याचा अर्थ तुम्ही कुटूंबाकडे लक्ष देत नाहीत त्यांच्या गरजा पुरवू शकत नाही त्यांना मानाने जगू देत नाहित वेळोवेळी अपमान करता.बर्‍याच ठिकाणी नवरे बायकोला तिच्या आईबापावरून शिव्या देतात मारझोड करतात तिला दुय्यम स्थान देतात .त्यांच्या गरजा भागवणे म्हणजे मोठा उपकार करतात अशी भाषा कायम बोलतात.घरातले काम फक्त बायकांचे आपण पैसे कमवतो मग तिने आयते सर्व द्यायला पाहिजे अशी संकुचित भावना ठेवून  कुटूंबात राहतात .अशा भावनेने कुटूंब खर्‍या अर्थाने सुखी म्हणता येणार नाही.कुटुंब हा तर केंद्रबिंदू असतो व त्याभोवती आपण फिरत असतो.
        कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांचा मान देवून आदर ठेवून आपण वागू या व कुटूंब सुखी करण्याचा प्रयत्न करू या .मी फार मोठा शहाणा व बाकी लोक मूर्ख .त्यांना काही अक्कलच नाही अशी भावना दूर ठेवून प्रत्येकाला  सन्मान देवून कुटुंबाची प्रगती करू या.

प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅंलेज मुंबई

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...