Skip to main content

प्रशंसा

स्तूती

प्रत्येकाला स्वताची स्तूती फार आवडते व दूसर्‍याची करताना जीभ अडखळते.आपली स्तूती ऐकतांना काहींचे कान फार आसूरलेले असतात.काहीजण आपले काम काढून घेण्यासाठी दुसर्‍याची खोटी स्तूती करतात व आपले काम काढून घेतात .काम संपले की मग  काहीच संबंध नसतात किंवा दुसर्‍याजवळ त्याच्याबद्दल शिव्या सुरू होतात.पण काहींना स्वताची स्तूती बिलकूल आवडत नसते .जेव्हा माणूस स्तूती करायला लागला की समजावे की त्याला तुमच्याकडे काही काम आहे किंवा काम काढून घ्यायचं आहे.वास्तविक लोकांनी तुमचे दोष दाखवले पाहिजे जेणेकरून त्या दोषांवर विचार करून तुम्ही तो काढण्यासाठी प्रयत्न करणार .खरे मित्र हे तुमच्यातले दोष दाखवणार.पण काहीवेळा लोकांना तुमच्यातले गुण दिसतच नाही फक्त दोष दिसतात किंवा गुणांनाच त्यांच्यामते दोष समजतात पण प्रत्येकाने आत्मपरिक्षण केले पाहिजे व कोण खरी प्रशंसा करतो व कोण खोटी. खोट्या स्तूतीकडे डोळेझाककेलेलीच बरी .कदाचित खोट्यास्तूतीमुळे माणूस सुधरण्याऐवजी बिघडू शकेल.त्याला वाटेल की आपल्यामध्ये आता सर्वच गुण आलेले आहेत .म्ळणून खोट्या स्तूतीला बळी पडू नका.काहीवेळा स्तूतीमुळे माणसात घमेंड निर्माण होते आणि दुसर्‍यांना कचरा समजायला लागतो पण काही माणसांमध्ये स्तूतीमुळे आत्मविश्वास निर्माण होतो व अवघड काम सहज करून जातात.काहीचे काम दुसर्‍याची स्तूती केल्यामुळे तिसर्‍याचं होत नाही.पण बरेच जण तोंडावर स्तूती करतात व पाठीमागून शिव्या देतात पण खरा माणूस स्तूतीने हूरळून जात नाही व टिकेने विचलित होत नाहीत कारण त्याला माहीत असतं आपण स्वता काय आहोत पण अशी माणसं फक्त बोटांवर मोजण्याइतकीच.सून सासूची स्तूती करते व सून ही सासूची कर्मचारी बाॅसची व बाॅस कर्मचार्‍यांची आई मुलाची तर मुले आईबाबांची भाऊ बहिणिची तर बहिण भावाची मित्र मित्रांची बायको नवर्‍याची तर नवरा बायकोचीअशा प्रमाणे लोक स्तूती करतात खरे की खोटे त्यांनाच माहीत.बघा तुम्हीही करता का स्तूती व ऐकता का स्तूती? खोटी करता की खरी विचार करा अस तुम्हालाही जमतं का

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...